आमदार कोरोटे यांनी पूर्ण केले आपले शब्द.
या लोकार्पणाच्या मुद्द्यावरून रंगला होता आजी-माजी आमदारात कलगीतुरा
गोंंदिय. देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीवरून या क्षेत्राचे काँग्रेसचे विद्यमान आमदार सहषराम कोरोटे व भाजपचे माजी आमदार संजय पुराम यांच्यात मागील दोन दिवसांपासून चांगलाच कलगीतुरा रंगला होता. या वादाला अखेर मंगळवार (ता.१५ आगस्ट) रोजी पूर्णविराम बसला असून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन आमदार सहषराम कोरोटे यांनी या इमारतीचे लोकार्पण केले आहे.
याप्रसंगी देवरी भागातील उपस्थित जनतेला मार्गदर्शन करतांनी आमदार कोरोटे म्हणाले की,अनेक दिवसापासून आपल्याकडे येथील जनतेच्या स्वास्थासाठी चांगली ईमारत नव्हती. आमच्या भागातील नागरीक व आरोग्य कर्मचारी आपला जीव मुठीत घेवून पडक्या ईमारती मध्ये आरोग्य सेवा घेत होते.त्यामुळे जी आपल्याकडे ग्रामीण रूग्णालयाची नवीन ईमारत तैयार झाली आहे. येथील जुन्या ईमारतीचे एक महिन्यपूर्वी मी आपल्या पक्षातील पदाधिकारी व मिडीयाचे प्रतिनीधींना सोबत घेवून पाहणी केली होती तेव्हा आम्हाला जुन्या ईमारतीमध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी गळने सुरू होते तर काही भिंतींना भेगा सुध्दा आढळल्या होत्या. या ईमारतीचे स्लैब कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. ही भयावह परिस्थिती बघून मी संबधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व कंत्राटदार याला सुचना केल्या की,आपण एक महिन्याच्या आत मध्ये येथील नवीन ईमारतीचे बांधकाम परिपूर्ण करावा. यात संबंधीत कंत्राटदारांनी या ईमारतीचे बांकाम आज पूर्ण झाले आहे.
या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कमी नाही.या ठिकाणी पाणि व विज प्रवाह सुरू झाले आहे.यात फक्त आरोग्याशी संबधीत टेबल,खुर्ची,साहित्य आणि उपकरण ह्या जुन्या ईमारती मधून या ठिकाणी स्थांनानंतर करणे उरलेले आहे. हे काम येत्या दोन चार दिवसात पूर्ण होउन या भागातील जनतेला चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होईल. फक्त तेवढेच उरलेले आहे. आता नक्कीच पणे शासकिय स्तरावर संबधीत सर्व यंत्रणेला सुचना करून आणी या बाबद मी स्वता: फालोप घेवून या भागातील जनतेला चांगली आरोग्य सेवा कशी मिळेल याकरीता पाठपुरावा करण्याची हमी देतो असे म्हटले.
आपण सर्व जनता देवरीच्या ग्रामीण रूग्णालयाच्या नवीन ईमारतीचे लोकार्पण सोहळ्याचे साक्षी आहात. असे प्रतिपादन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले. देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण झाली असून या इमारतीतून कारभार चालविणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ करणे असे आहे. देवरी येथे १२ कोटी ५० लाख रुपये खर्चून ग्रामीण रुग्णालयाची नवीन ईमारत तयार करण्यात आली आहे. या इमारतीचे लोकार्पण मंगळवार १५ ऑगस्ट रोजी करून रुग्णांची गैरसोय दूर करणार असल्याची भूमिका आमदार सहषराम कोरोटे यांनी घेतली आणि अखेर आज स्वातंत्र्य दिनाचे औचित साधून आमदार कोरोटे यांनी या रुग्णालयाच्या नवीन ईमारतीचे लोकार्पण केले आरोग्यमंत्र्यांना भेटून लवकरच या रुग्णालयात रुग्णांना योग्य उपचार देण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन आमदार कोरोटे यांनी यावेळी दिले अशाप्रकारे आमदार कोरोटे यांनी जुन्या ईमारतीच्या भेटी दरम्यान दिलेले आपला शब्द पाळल हे विशेष.
या लोकार्पण सोहळ्यात कांग्रेस पक्षाचे गोंदिया जिल्हा परिषदेचे गटनेते संदीप भाटिया, माजी तालुका अध्यक्ष राधेशाम बगडिया, महिला तालुकाध्यक्ष सुनंदाताई बहेकार,देवरी शहराध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, रा.कां.चे तालुकाध्यक्ष सी. के. बिसेन, वरिष्ठ कार्यकर्ता गोपाल तिवारी, नगरसेवक सरबजीतशिंग भाटिया, पं.स. सदस्यप्रल्हाद सलामे, रंजित कासम, भारतीताई सलामे, अनुसयाताई सलामे, नगरसेवक मोहन डोंगरे,शकिल कुरेशी, नितीन मेश्राम, नगरसेविका सुनिताताई शाहू , म रोशन भाटिया, कुलदीप गुप्ता,अविनाश टेंभरे, ओमराज बहेकार, बळीराम कोटवार, सुरेन्द्र बन्सोड, सचिन मेळे, सुषमाताई वैद्ये, अणवंताताई आचले, सिमाताई कोरोटे, छायाताई मडावी, रिनाताई बावनथडे, मीनाताई राऊत, ताराताई टेंभुरकर, उज्वलाताई कोचे, मनीषाताई डुंभरे, प्रदीप देशमुख, कैलास देशमुख, नरेश राऊत, जैपाल प्रधान, कलिराम किरसाण, छगन मुंगनवार, पाशाभाई सय्यद, अंतरिक्ष बहेकार यांच्यासह देवरी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच,कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
अखेर आमदार कोरोटे यांनी केले देवरी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन ईमारतीचे लोकार्पण
RELATED ARTICLES