गोदिया : महाराष्ट्र राज्य अगनंवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्यावतीने २० सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजे पतगां मैदान वरून जिलाधिकारी व जिल्हा परिषदे वर मोर्चा काढण्यात आला. मोच्याचे नेतृत्व आयटकचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, कॉम्रेड रामचंद्र पाटील, राज्य सचिव विठाताई पवार, जिल्हा अध्यक्ष शकुंतला फटींग, जिला सचिव पोणीॅमा चुटे, राज्य कौन्सिल जिवनकला वैध, अनिता शिवनकर यांनी केले. गोदिया जिल्हातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनिस या आंदोलनात शामिल होत्या. मुख्यमंत्री व महिला बालकल्याण मंत्री याच्या नावे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आंगणवाडी सेविका मदतनिस याचा मांनधन वाढ करण्यात यावे, सेविकांना १० हजार रुपये, मदतनिस ७५० वाढ करा, पेन्शन योजना लागू करण्यात यावी, ग्रॅजुईटु लागू करण्यात यावी व जिआर काढण्यात यावे, मेडिकल छुट्टी लागू करण्यात यावे, उन्हाळ्यात एक महिन्याची छुट्टी देण्यात यावी, मांगन्या मान्य न झाल्यावर २३ व २४ सप्टेंबरला मुबंई मंत्रालयावर उपोषण आणि 25 सप्टेंबरला मुंबई आझाद मैदानावर जेल भरो आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती हौसलाल रहांगडाले राज्य उपाध्यक्ष यांनी दिली आहे. मोच्याचे नेतृत्वात हौसलाल रहांगडाले, राज्य उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, जिल्हा सचिव आयटक विठा पवार, राज्य सचिव जिवनकला वैध, राज्य कार्यकारिणी सदस्य शंकुतल फटिग, जिल्हा अध्यक्ष पोणीॅमा चुटे, जिला सचिव अनिता शिवनकर, प्रणिता रंगारी, लालेश्वरी शरणागत, अजंना ठाकरे, देवागंना, बिरजूला, तिडके, सुनिता मंलगाम, पुष्पा भगत, शामकला मसराम, राजलक्ष्मी हरिणखेडे, पुष्पा ठाकूर यांनी केले.
अगणंवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने जेल भरो आंदोलन
RELATED ARTICLES