कोळसा विकला अन् पुरविली माती
गोंदिया : कोळसा विकून त्या ऐवजी माती व गिट्टी पुरवून अदानी पावर प्लांटला दोघा टिप्पर चालकांनी चूना लावल्याचा प्रकार गुरूवारी (दि.१४) सायंकाळी ४ वाजता दरम्यान उघडकीस आला आहे. तिरोडा येथील अदानी पावर प्लांटमध्ये दगडी कोळसा पोहोचविण्यासाठी टिप्पर क्रमांक एमएच ४०-सीपी ३०११ मध्ये ३६ टन ३६० किलो कोळसा किंमत एक लाख सहा हजार १६३ रुपये तर दुसऱ्या टिप्पर क्रमांक एमएच ४०-डीएल ५०६२ मध्ये २६ टन २४० किलो कोळसा किंमत ७० हजार ३५५ रूपये असा एकूण ६२ टन ६०० किलो कोळसा पाठविण्यात आला होता.
टिप्पर चालक रोहित पांडे (२२, रा. खडबडा, सोनवर्षा-मध्यप्रदेश) व घरभरण जगन्नाथ यादव (५८, रा. २०९ वरून आर्केट नियर लॉकिंग , इंडस्ट्रीज, ठाणे पश्चिम) यांनी टिप्परमधील कोळसा विकून टाकला व त्या ऐवजी टिप्परमध्ये माती, दगड व गिट्टी भरून अदानी पावर प्लांटमध्ये पुरविले. हा प्रकार उघडकीस आल्याने फिर्यादी विनोद सुखदेव चव्हाण (५१, रा. गांधी वाॅर्ड, तिरोडा) यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी दोघा टिप्पर चालकांवर भादंवि कलम ४०८, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दलालवाड करीत आहेत.
अदानी पावर प्लांटला लावला चूना
RELATED ARTICLES