गोंदिया : पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत कार्यरत असलेले ग्रामसेवक रंजन भैयालाल नेवारे वय 52 वर्षे यांचा कारंजा येथील हरी ओम कॉलनी जवळ (दि. 7 नोव्हें.) रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. मृतक नेवारे हे दुचाकीवरून प्रवास करत असताना प्रवासादरम्यान चारचाकी वाहन क्रमांक MH 49 AS 0917 जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. ते आपल्या दुचाकीवरून गोरेगाव कडे तपासणी नाका मुंडीपार येथे कर्तव्याच्या ठिकाणी जाण्यास निघाले होते. त्यांच्याकडे गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत सोनेगाव व पाथरी ग्रामपंचायत कार्यभार होते. त्यांच्या अवेळी झालेल्या निधनाने त्यांच्या परिवार सहित पंचायत समिती परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू, कारंजा येथील घटना
RELATED ARTICLES