Wednesday, February 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedअवैध कत्तलखाना चालविणार्यांवर कठोर कारवाईसाठी काढला मोर्चा

अवैध कत्तलखाना चालविणार्यांवर कठोर कारवाईसाठी काढला मोर्चा

गोंदिया : पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झाकीर हुसेन वार्डात १२ डिसेंबरला अवैधरित्या चालत असलेल्या कतलखान्यावर छापा घालून दीड क्विंटल गोमांस जप्त करुन १४ गोवंंशाना जिवनदान देण्यात आले होते.याघटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्यासोबतच शहरात सुरु असलेल्या या अवैध कतलखान्यावर कारवाई करण्याच्या मागणीला घेत दि.१८ रोजी शहरातील शिवालय मंदीर परिसरात सभा घेत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.तसेच शिवालय मंदिरापासून नगरपरिषदेपर्यंत मोर्चा काढून कठोर कारवाईची मागणी गौरक्षक दलाच्यावतीने करण्यात आली.

या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन अवैध कत्तलखान्यावर बुलडोझरद्वारे तात्काळ विध्वंसात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचप्रमाणे नगर परिषद हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर व नियमबाह्य बांधकामांबाबतही मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.दिलेल्या आश्वासनानुसार एका आठवड्याच्या आत अवैध कत्तलखाना पूर्णतः उध्वस्त करण्यात आला नाही, तर बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यापेक्षाही तीव्र, व्यापक आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments