पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये अवैध हातभट्टी दारू गाळणाऱ्या एकूण 5 इसमांवर कारवाई करण्यात आली. तसेच महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये एका इसमावर सट्टापट्टीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई आज मंगळवार, 22 ऑगस्ट रोजी करण्यात आली.
यांच्यावर अशी झाली कारवाई…
आशा राजेंद्र भोंडेकर रा. संत रविदास वार्ड हिच्याकडून 40 हजार रुपये किंमतीचा 400 किलो मोहसळवा जप्त करण्यात आला.
अखिल रहीम खान पठाण रा. संत रविदास वार्ड याच्याकडून हातभट्टीचे साहित्य व मोहसळवा असा एकूण 1 लाख 06 हजार 450 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
जयश्री सोविंदा बरेकर रा. सिल्ली हिच्याकडून मोह सडवा व हातभट्टी दारू असा एकूण 12 हजार 100 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
गोपी भैयालाल कुंबरे रा. काचेवाणी यांच्याकडून एकूण 1 लाख 71 हजार 550 रुपये किंमतीचे हातभट्टीचे साहित्य व मोहसळवा जप्त करण्यात आला.
किरण राजेंद्र भालाधरे रा. आंबेडकर वार्ड तिरोडा याच्याकडून हातभट्टीचे साहित्य व मोहसळवा असा एकूण 2 लाख 60 हजार 300 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
नयन सुनील नागरिकर राहणार भूतनाथ वार्ड याच्या सट्टापट्टीच्या धंद्यावर रेड करून त्याच्या ताब्यातून सट्टापट्टीचे साहित्य व सटापट्टी घेऊन मिळवलेले पैसे असे एकूण 805 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाईमध्ये एकूण 5,90,400 रुपयांची हातभट्टी दारू, मोहसळवा व भट्टीचे साहित्य हे जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले आहे. तसेच सट्टापट्टीच्या कारवाईमध्ये एकूण 805 रुपये रोख व सट्टापट्टीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक देवीदास कठाळे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जोगदंड, महिला पोलीस फौजदार राधा लाटे, पोलीस हवालदार बावणे, तिरपुडे, पोलीस शिपाई शिवराज शेंडे, अविनाश लोंढे, सौरभ देवगडे, डहारे, महिला पोलिस शिपाई अभिलाषा वाल्दे यांनी केली.
अवैध धंद्याविरुद्ध कारवाई : 5.90 लाखांचा माल जप्त 6 जणांवर कारवाई
RELATED ARTICLES