घाटबोरी कोहळी येथील प्रकरण
गोंदिया : वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या सहवनक्षेत्र कार्यालय सौंदड मधील घाटबोरी कोहळी येथील अवैद्य रानडुक्कर शिकार प्रकरणी चार आरोपींना पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.
12 मार्च रोजी सकाळी दहा वाजता पुरुषोत्तम कदिरा कांबळे वय 40 , अश्विन अंबादास बनसोड वय 33 , मंगेश व्यंकट मेश्राम वय 32, मुनेश्वर दयाराम वंजारी वय 34 सर्व राहणार घाटबोरी/ पंचवटी यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की आरोपी अश्विन अंबादास बनसोड यांच्या शेतात अवैद्य विद्युत करंट लावून रानडुकराची शिकार करण्यात आली. अवैद्य रानडुक्कर शिकार प्रकरणाची माहिती मिळताच सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील जाधव यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक युवराज ठवकर , युवराज राठोड , नरेंद्र वाढई , सुधाकर वलथरे ,संतोष घुगे वनक्षेत्र सहाय्यक रेगेपार ,वनरक्षक नरेश पातोडे , राजेश्वर उईके, डिलेश्वरी ठाकरे, संजय चव्हाण, तरुण बेलकर, बिंदू राहंडाले , फीनेश्वरी चौधरी, इंदू राऊत , हिना बागडकर ,वनमजूर सदाशिव फुंडे, दिगाबर भंडारकर , शेंडे यांच्या सहकार्याने आरोपींना पकडण्यात यश आले आहे. पुढील तपास वनविभाग करीत आहे.
रानडुक्कर शिकार प्रकरणी चौघांना अटक
RELATED ARTICLES