गोंदिया : “जिथे कमी तिथे आम्ही” या उक्तीवर चालणाऱ्या ‘नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक’ यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत पेठ तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील विविध शाळांमध्ये 300 हुन अधिक गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आय जी पी (स्पेशल) दत्तात्रय कराळे, अशोका ग्रुपच्या सौ आशाताई कटारिया, नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव, यांच्या हस्ते सर्व गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले, आपल्याला स्वेटर मिळणार व आता आपल्याला थंडी पासून संरक्षण मिळेल व ही वस्तू आज एका मोठ्या अधिकाऱ्यांकडून मिळणार याचा आनंद सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता, शाळेच्या विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे आदिवासी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी आय जी पी दत्तात्रय कराळे सर ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या मूळ गावाला कधीच विसरायचे नाही असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व गावातील स्वच्छतेचे व स्वागताचे कौतुक केले, रामभाऊ हरी इंपाळ ज्यांनी स्वमालकीची जागा कायमस्वरूपी तोंडवळ शाळेला दान केली यांचा विशेष सत्कार कराळे सर यांनी केला, आशाताई कटारीया यांनी संस्थेचे कौतुक केले .
सौ अलका पाटील,आयआयटी दिल्ली येथे शिक्षण घेणारी कृ श्रेष्ठ सोमवार, ,पोलीस निरीक्षक डी एम गोंदके, तुकाराम पांडूरंग भोये (माजी सरपंच आडगाव),पीएसआय के एम दरगुडे ,सोमनाथ नाटे, रतन गांगुर्डे, पेठ पोलीस स्टेशन अमलदार राम पवार, पि. सी. राहुल राऊत, पी. सी. आर. एच. पवार आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्नेहल देव नमस्ते नाशिक फाउंडेशन ह्या नेहमी आदिवासी दुर्गम भागातील घटकांसाठी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात. आय जी पी दत्तात्रय कराळे यांनी संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले व यापुढेही असेच कार्य करत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. पेठ तालुका जिल्हा नाशिक तोंडवळ, रानविहीर, बेलपाडा, गायधोंड, आडगाव(बु), मांडणपाडा, ह्या गावांमध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम पार पडण्यासाठी अशोका ग्रुप यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेचे संदीप देव यानी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
आदिवासी भागातील विविध शाळांमध्ये 300 पेक्षा अधिक गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप
RELATED ARTICLES