आमदार कोरोटे यांची उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या कडे मागणी
अन्यथा येथील नागरीकांसह आंदोलन करण्याचा ईशारा
गोंदिया : आमगाव येथील नगरपरिषदेचा प्रश्न गेल्या २०१७ पासून प्रलंबित असून त्यामुळे नगरपरिषद क्षेत्रात असलेली आठ गावांचा विकास खुंटला आहे. तेथील स्थानिक जनता बेहाल झाली आहे. येथील लोकांना नागरीक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तरी या समस्येकड आपण घालुन त्वरीत मार्गी लावावे अशा आशयचे निवेदन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना मंगळवार (ता.२९ आगस्ट) रोजी सादर केले.
सादर केलेल्या निवेदनात आमदार कोरोटे यांनी म्हटले आहे की, आमगावं येथील नगरपरिषदेचा प्रश्न गेल्या २०१७ पासून प्रलंबित असून त्यामुळे नगरपरिषद क्षेत्रात असलेली आठ गावांचा विकास खुंटला आहे. तेथील स्थानिक जनता बेहाल झाली आहे. येथील लोकांना नागरीक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. ह्या आमगाव नगरपरिषदेचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत मी अनेकदा मा.मंत्री यांना भेटून वारंवार निवेदन देवून चर्चा केली. शासनस्तरावर अनेकदा पाठपुरावा करुन विधानसभा सभागृहात विधासभेच्या विविध आयुधा द्वारे चर्चा करुन सुध्दा अजून पर्यंत या समस्यांचे निराकरण करण्यात आले नाही. आमगाव नगरपरिषदेचा प्रश्न प्रलंबित आहे. तरी आपणास विनंती आहे की, आमगाव नगरपरिषद येथील त्वरीत निवडणूका घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशा आशयचे निवेदन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना सादर केले. अन्यथा येथील नागरीकांसह मी स्वत: तीव्रआंदोलन करण्यात येईल असा ईशारा ही निवेदनातून दिला आहे.
आमगावं नगरपरिषदेची निवडणूक त्वरीत घ्या
RELATED ARTICLES