आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी, आदिवासी विकास मंत्र्यांनी साधला संवाद

0
194

गोंदिया : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके हे गुरुवारी जिल्ह्याचे दौऱ्यावर असतांना त्यांनी शासकीय आदिवासी माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा, शेंडा येथे अचानक भेट दिली. यावेळी मंत्री श्री. उईके यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत शाळेत दिला जाणारा पोषण आहार, विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुविधा तसेच पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. या भेटीदरम्यान मंत्री श्री. उईके यांच्यासमवेत आमदार मिलिंद नरोटे (गडचिरोली), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद व इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here