50 किमी अंतरावरून कारभार : शिक्षण विभागात भाराभर चिंध्या
गोंदिया. गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागाचा कारभार सैरभैर झाला आहे. निव्वळ प्रभारावरच कारभार सुरू आहे. प्रभार देताना तारतम्य देखील बाळगण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांचे स्थानांतर झाल्याने त्यांचा प्रभार सालेकसाचे गटविकास अधिकारी विशाल डोंगरे यांच्याकडे सोपविण्यात आला. आधीच त्यांच्याकडे आमगावच्या गटविकास अधिकारी पदाचा देखील प्रभार आहे. गोंदिया ते सालेकसा 50 किलोमीटरचे अंतर आहे. त्यातच सध्या शिक्षण विभागात कामे वाढल्याने त्यांच्या प्रभारामुळे एक ना धड, भाराभर चिंध्या अशी तिनही ठिकाणची गत झाली आहे.
शिक्षण विभाग हे महत्वाचे खाते आहे. भावी पिढी घडविण्याचे काम या विभागामार्फत करण्यात येते. त्यासाठी माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासकीय प्रमुखांची मोठी जबाबदारी असते. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. त्यापदाचा प्रभार विभागातील उपशिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांच्याकडे सोपविण्यात आला. तर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख बदलून गेल्याने पदाचा प्रभार सालेकसा येथील गटविकास अधिकारी विशाल डोंगरे यांच्याकडे सोपविण्यात आला. विशाल डोंगरे यांच्याकडे आधीच आमगावचा प्रभार होता. आता पुन्हा शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार आला. माध्यमिक विभागाकडे न्यायालयाशी संबंधित अनेक प्रकरणे असतात. त्यामुळे या पदावर असलेला व्यक्ती व्यस्त असतो. अशात दोन पंचायत समित्यांचा कारभार सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. सालेकसा येथे नियमीत गटशिक्षणाधिकारी म्हणून विशाल डोंगरे असताना तेथील काम ते करू शकतात, मात्र आमगावचा प्रभार असल्यामुळे या तालुक्याला त्यांना न्याय देण्यास अडचण होत आहे. प्रभाराच्या घोडेबाजारात प्रशासकीय घडी विस्कटल्याचे दिसून येत आहे.
एकाच अधिकाऱ्याकडे तीन जबाबदाऱ्या
RELATED ARTICLES