पूजा अखिलेश सेठ यांच्या प्रयत्नातून वर्गखोली व प्रसुतीगृहाचे बांधकाम
गोंदिया. तालुक्यातील ग्राम कटंगी कला येथे सौ पूजा अखिलेश सेठ, सभापती, समाजकल्याण यांच्या प्रयत्नाने समग्र शिक्षा अंतर्गत वर्ग खोली 11.82 लाख रुपये व प्राथमिक आरोग्य विकास अंतर्गत प्रस्तुतीगृहाचे बांधकाम करीता 10 लाख रुपये असे एकूण 21.82 लाख रुपये बांधकामाच्या लोकार्पण सोहळाचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते, सौ पूजा अखिलेश सेठ यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया थाटात संपन्न झाला.
याप्रसंगी माजी आमदार श्री राजेंद्र जैन मार्गदर्शन करताना म्हणाले की, आमचे नेते खासदार श्री प्रफुल पटेलजी हे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही राजकीय भेदभाव न ठेवता सदैव कटिबद्ध आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात भंडारा व गोंदिया जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. कोरोना काळात वैद्यकीय सुविधा पुरविण्यात श्री पटेलजी यांचे कार्य मोलाचे आहे. आरोग्याच्या सुविधा असो की सर्व सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन श्री जैन यांनी केले.
मा. खासदार श्री प्रफुल पटेलजी व माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या क्षेत्राच्या अडी अडचणी सोडविण्यास कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही सौ पूजा अखिलेश सेठ यांनी दिली. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, सौ.पूजा अखिलेश सेठ, मोहिनी वराडे, अखिल सिंग, नन्दूभाऊ बिसेन, अखिलेश सेठ, श्री रमेश वरखडे, जी.के. कापसे, बि आर पटले, सुभाष बावनकर, आबिद भाई शेख, सुनीता लांजेवार, बी.डी.डोंगरे, राजू एन जैन, गणेश लांजेवार, राजुभाऊ मारवाड़े, डॉ. तुरकर, धन्नालाल बघेले, सदाशिव वाघाडे़, राजु मारवाडे, रविकला ताई, दीपकभाऊ डोंगरवार, शिशुपाल उपरीकर, मंजीत सहारे, गौतमाताई ऋषि, विमला उइके, सरिता चौधरी, कमलाबाई श्रीभाद्रे, निता नेवारे, दिपलता बानेवार, देवीका नागरिकर, संतोषी भागडकर ,तीर्थराज बघेले, प्रेमलाल नागपुरे, छमेंद्र नागरिकर, राजेश वराडे, दिलीप मोहनकर, प्रमोद नागपुरे, दीपक नागरिकर, डॉ सरिता ठाकुर, रौनक ठाकूर सहीत मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु लीना पटले तर आभार सौ जी के कापसे मॅडम यांनी केले.
कटंगीकला येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण
RELATED ARTICLES