10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त : चिचगड पोलीसांची धडाकेबाज कारवाई
गोंदिया : चिचगड पोलीसांना मिळाले ल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे चिचगड ते देवरीकडे जाणारे नवेगाव बांध टी-पाईट डांबरी रोडा वर २३ फेब्रुवारीला रात्री दरम्यान नाकाबंदी करुन २३.१५ वा. दरम्यान छापा कारवाई केले असता, अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर ट्रक क्र. टी.सी.१२/यु. बी. ६०३३ वाहन मिळुन आले.सदर मिळुन आलेल्या कंटेनरच्या डाल्याची पाहणी केली असता डाल्यामध्ये एकुण ३२ नग गोवंश जाती चे जनावरे कोणतेही प्रकार ची हालचाल न करता निर्दय तेने कोंबलेल्या स्थितीत दिसुन आल्याने अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर ट्रक किंमती ९०००००/-रु व ३२ नग गोवंश जातीचे पाळीव जनावरे किं. १,६०,०००/-रु. असा एकुण १०,६०,०००/- रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.
कंटेनर मधील जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था व्हावी याकरीता सुकृत गौशाला कल्याणकारी संस्था खैरी पो. पिंपळगाव ता. लाखनी जि. भंडारा येथे दाखल करण्यात आलेली आहेत.
प्रकरणी आरोपी अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर ट्रक क्र. टी. सी. १२/ यु.बी. ६०३३ चे चालक व सहकारी आरोपी जाहीर गलीब बेग वय ३० वर्षे रा.वार्ड नं.१४ पठाण पुरा ता. मुर्तीजापुर जि.अकोला, मोहम्मद रिजवान मोहम्मद मुस्तफा वय ४३ वर्षे रा.घर क्र.१२२ ईटा भटटा चौक वंदेवी नगर यशोधरा पोलीस स्टेशन ता.जि. नागपुर यांचेविरुध्द पोलीस ठाणे चिचगड येथे कलम ११(१) (ड ) प्रा.णी.वा.का. सहकलम ५ (अ), ६, ९ (अ) महाराष्ट्र पशुसंवर्धन अधि, १९७६ सहकलम ११९ मु. पो. का. कलम ६६ / १९२ मो.वा.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशन चिचगड येथील पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सा. गोंदिया श्री. निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चिचगडचे ठाणेदार स.पो.नि. शरद पाटील, पो. हवा. ब्रिजलाल मरसकोल्हे, ना.पो.शि. कमलेश शहारे, ना.पो.शि.अमित मेंढे, पो. शि. संदीप तांदळे यांनी केलेली आहे.
कत्तलीसाठी 32 जनावरांची वाहतुक
RELATED ARTICLES