Wednesday, April 24, 2024
Google search engine
HomeUncategorizedकाळ्या बिबट्याची शिकार; आरोपी ताब्यात

काळ्या बिबट्याची शिकार; आरोपी ताब्यात

गोंदिया : महाराष्ट्रात काळ्या बिबट्याचे अस्तित्व दुर्मिळ असतानाच नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात जुलै २०२१ मध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्रात काळय़ा बिबट असल्याचे समोर आले होते. त्या काळ्या बिबट्याची शिकार जानेवारी 23 मध्ये करणाऱ्यां आरोपींना वनविभागाने चार दिवसापुर्वी पकडल्याची पुष्ठी नागझिरा नवेगावबांध व्याघ्रप्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी प्रदिप पाटील यांनी केली.
डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब यांनी ‘ट्विटर’वर ते प्रसिद्ध केल्यानंतर व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापनाने काळय़ा बिबटय़ाचे अस्तित्व मान्य केले होते.मात्र गेल्या पावणेदोन वर्षांपासून या व्याघ्रप्रकल्पात ठाण मांडून असलेल्या काळय़ा बिबटय़ाला व्याघ्रप्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना निसर्गाचे हे देणे सांभाळता आले नाही. आणि देवरी तालुक्यातील मंगेझरी व पालांदूर येथील गावकऱ्यांनीच काळय़ा बिबटय़ाचा बळी घेतल्याचे एका प्रकरणाचा तपास करतांना उघ़डकीस आले आहे.त्या आरोपीमध्ये शामलाल ढिवरू मडावी, दिवारू कोल्हारे, मानिक दारसू ताराम, अशोक गोटे, हे चारही राहणार मंगेझरी ता. देवरी,जि.गोंदिया यांचा समावेश आहे. जानेवारी 23 मध्ये त्यांनी फास लावला आणि बिबट फासात अडकला. त्याने स्वत:ला सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. फासात अडकूनही तो मरण पावला नाही म्हणून मंगझेरीतील या गावकऱ्यांनी त्याला भाल्याने मारले. १३ जानेवारीलाच ही घटना घडली. तत्पूर्वी १२ जानेवारीला कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचे छायाचित्र आढळले होते.त्याच्या शिकारीची कुणकुण होती. पण कुणीही अवाक्षर काढले नाही. मात्र, खात्यातीलच एका अधिकाऱ्याने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करीत छडा लावला.त्यांच्या या चौकशीमुळे वाघासह इतरही वन्यप्राण्याच्या शिकारीही उघडकीस आल्या असून आरोपींना बेड्या ठोकण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments