Thursday, November 14, 2024
Google search engine
HomeUncategorizedक्षेत्राच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या : राजेंद्र जैन

क्षेत्राच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या : राजेंद्र जैन

गोंदिया : क्षेत्राच्या सिंचन, वैद्यकीय, पायाभूत सुविधासह विकास व प्रगतीसाठी, जन कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महायुतीचे उमेदवार यांना बहुमताने निवडून द्या. गोंदिया नंबर वन करण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कोणतीही किंतु, परंतु न करता जिद्दीने कामाला लागा असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

ग्राम कुडवा अंतर्गत विशाल लॉन येथे गोंदिया विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार श्री विनोद अग्रवाल यांच्या प्रचारार्थ संपन्न झालेल्या बैठकीत माजी आमदार श्री राजेंद्र जैन बोलतं होते. बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, पुजा अखिलेश सेठ, बालकृष्ण पटले, कुंदन कटारे, गणेश बरडे, केतन तुरकर, रमेश गौतम, अखिलेश सेठ, किर्ती पटले, निरज उपवंशी, रामचंद्र कटरे, लिमेंद्र बिसेन, प्रभाकर ढोमने, कमल फरदे, नंदू बिसेन, कुणाल बिसेन, नुरूनाथ दीहारी, कुलदीप रीनायत, शैलेश वासनिक, पन्नालाल डहारे, करीम बाबा बिसेन, सुनील पटले, रौनक ठाकुर सहित महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments