गोंदिया : आज भारत सभागृह, साकोली येथे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आर पी आय प्रणित महायुतीचे उमेदवार श्री अविनाश ब्राम्हणकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ खा.प्रफुल पटेल व आ. परिणय फुके, मा.खा.सुनील मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत मित्रपक्षाची संयुक्त सभा पार पडली.
आम्ही भाजपाशी केलेली मैत्री हि कायम ठिकविण्यासाठी केलेली आहे. प्रत्येकाने मैत्री व सन्मान ठेवणे गरजेचे आहे. पूर्वी व आत्ताही जिल्ह्यात आम्ही राजकारणासोबत समाजकारण करण्याचे काम केले आहे. शिक्षण, रोजगार, शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न समजून ते सोडविण्याचे काम सतत केले. रोजगारासाठी भेल प्रकल्प आणण्याचे काम केले परंतु त्याची भेलपुरी करण्याचे काम विरोधकांनी केले. आता भेल चालू करायचे आहे त्यासाठी महायुतीचे उमेदवार श्री अविनाश ब्राम्हणकर यांना निवडून द्या या क्षेत्रातील समस्या प्राधान्याने सोडवू असे आवाहन खा. श्री प्रफुल पटेल यांनी केले. सभेला सर्वश्री प्रफुल पटेल, परिणय फुके, सुनील मेंढे, अविनाश ब्राह्मणकर, नानाभाऊ पंचबुद्धे, धनंजय दलाल, प्रकाश बालबुद्धे, सुनील फुंडे, हेमकृष्ण कापगते, शिवराम गिऱ्हेपुंजे, शामजी झिंगरे, तू. रा. भुसारी, रेखाताई भाजीपाले, माहेश्वरी ताई, वनिता डोये, भुमीता धकाते, जयाताई भुरे, मंगेश मेश्राम, नेपाल रंगारी, भोजराम कापगते, अमोल हलमारे, नितीन खेडीकर, रवी परशुरामकर, सुभाष आकरे, बालुभाऊ चुन्ने, बोळणे सर, विलास गहाणे, मनीष कापगते, प्रीतीताई डोंगरवार, प्रदीप गोमासे, राकेश राऊत सहित मोठया संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
क्षेत्रातील समस्या प्राधान्याने सोडवू : खा. श्री प्रफुल पटेल
RELATED ARTICLES