Thursday, November 14, 2024
Google search engine
HomeUncategorizedखा.प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाला यश, 395 कोटीच्या प्रशासकीय मान्यतेला मंजुरी

खा.प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाला यश, 395 कोटीच्या प्रशासकीय मान्यतेला मंजुरी

डांगोरली उपसा सिंचन प्रकल्पामुळे परिसर होणार सुजलाम सुफलाम

गोंदिया : वैनगंगा नदीवर डांगोरली उपसा सिंचन उच्च पातळी बंधारा निधी अभावी रखडलेला होता. उपसा सिंचन लवकरात लवकर पूर्ण होऊन परिसरातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी खा.प्रफुल पटेल हे प्रयत्नशील होते. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री माननिय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननिय देवेंद्र फडणवीस यांच्याशी सतत पाठपुरावा केला होता. याचे फलित म्हणजे काल दि. १० ऑक्टोबर ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डांगोरली उपसा सिंचन प्रकल्पाला उच्च पातळी बंधाऱ्याकरिता टप्पा १ अंतर्गत ३९५ कोटी रुपयाचा निधी मंजूरी प्रदान करण्यात आलेला आहे.

गोंदिया तालुक्यातील डांगोरली व आसपासच्या परिसरातील गावांना याचा लाभ मिळणार आहे. मागील अनेक वर्षा पासून रखडलेल्या हा प्रकल्प पूर्ण व्हावा याकरिता परिसरातील शेतकऱ्यांनी खा. प्रफुल पटेल यांच्या कडे मागणी केली होती. डांगोरली उपसा सिंचन प्रकल्पाला ३९५ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेली असल्याने हा प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन परिसरातील अंदाजे ५९६१ हेक्टर शेतजमिनीचे सिंचन होणार असून परिसरातील शेतकरी विविध पिकांचे उत्पादन करून सुजलाम सुफलाम होणार आहे. परिसरातील शेती सिंचनाखाली येणार असल्याने शेतकरी बांधवानी खा. प्रफुल पटेल यांचे आभार मानले. तसेच राज्य सरकारचे ही आभार मानले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments