गोंदिया : तिरोडा पंचायत समितीअंतर्गंत येत असलेल्या शिक्षण विभागातील गांगला केंद्राचे केंद्रप्रमुख व विषय़ शिक्षक धनपाल श्रीराम पटले (वय 47,रा. नेहरू वार्ड,तिरोडा यांना 9 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करुन स्विकारल्याप्रकरणी आज 3 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.तक्रारदार हा भंडारा जिल्ह्यातील गणेशनपूर येथील रहिवासी असून हे शिक्षक असल्याने प्रकृती ठीक नसल्याने माहे डिसेंबर 2022 व जानेवारी 2023 मध्ये वैद्यकीय रजेवर होते.प्रकृती ठीक झाल्यावर ते जानेवारी 2023 मध्ये कर्तव्यावर हजर झाले.परंतु या वैद्यकीय रजा कालावधीतील त्यांचा पगार काढण्यात आला नसल्याने त्यांनी वैद्यकीय रजा मंजुर करून या कालावधीतील पगार काढणेकरिता गटशिक्षण अधिकारी,पंचायत समिती तिरोडा यांचेकडे कागदपत्रासह अर्ज केला.परंतु त्यांनी वैद्यकीय रजा मंजूर करून पगार काढला नाही.यातील आरोपी केंद्रप्रमुख याने तक्रारदारास गटशिक्षण अधिकारी यांचेकडून त्यांची वैद्यकीय रजा मंजूर करून त्या कालावधीतील पगार काढून देणेकरिता 10,000 रु. लाच रकमेची मागणी करून तळजोळी अंती 9,000 रु. लाच रकमेची मागणी करून आज 03/03/2023 रोजी सापळा कार्यवाही दरम्यान आरोपीने तक्रारदाराकडुन जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा ,गांगला येथे लाच रक्कम स्विकारल्याने ताब्यात घेण्यात आले.आरोपीविरुध्द तिरोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्याची प्रकिया सुरु करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर,अप्पर पोलीस अधिक्षक मधुकर गिते,पोलीस उप अधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्ददर्शनात पोलीस निरीक्षक सारंग मिराशी,पोलीस निरीक्षक अतुल तवाडे,स.फौ. विजय खोब्रागडे,पो. हवा. संजय बोहरे, नापोशी संतोष शेंडे,मंगेश काहालकर, संतोष बोपचे ,अशोक कापसे ,चालक दीपक बतबर्वे यांनी पार पाडली.
रवी ठकरानी
प्रधान संपादक
9359328219