रामनगर पोलिसात गुन्हा दाखल
गोंदिया: रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढराबोडी येथील गौशाळेत काम करणाऱ्या मजूर महिलेवर तेथील गुराख्याने बलात्कार केल्याची घटना ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता घडली. दुसऱ्या दिवशी आरोपी रतनारा येथील लग्नाच्या आशिर्वाद समारोहात गेला असतांना त्याला लोकांनी बेदम मारहाण केली. प्रदीप भोजराज नागपुरे (३५) रा. महालगाव/ मुर्दाळा असे आरोपीचे नाव आहे.
गोंदिया तालुक्याच्या पांढराबोडी येथे एक गौशाला आहे. या गौशालेत गुरे चारण्यासाठी एक गुराखी ठेवण्यात आला होता. महालगाव मुर्दाळा येथील प्रदीप नागपुरे हा मागील दोन वर्षापासून या गौशाळेत गुराखी म्हणून काम करीत होता. त्याच गौशाळेत मागील एक वर्षापासून काही महिला त्या ठिकाणी शेण उचलण्यासाठी व उतर कामे करण्यासाठी मजूर म्हणून कार्यरत आहेत. परंतु या मजूरांपैकी २८ वर्षाच्या महिलेवर आरोपीने ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता स्वयंपाक खोलीत अत्याचार केला. ८ एप्रिल रोजी रतनारा येथे एका लग्न समारंभात तो जेवण करण्यासाठी गेला असतांना या प्रकरणावरून लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिस ठाण्यात ९ एप्रिल रोजी भादंविच्या कलम ३७६ (२), ३२३, ३४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आसाराम चव्हाण करीत आहेत.
गुराख्याने महिलेवर केला अतिप्रसंग
RELATED ARTICLES