गोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे गोंदिया आगारात कार्यरत चालक खोमेंद्र भोजराज पारधी ३५ वर्ष याने आपले फुलचूर गोंदिया येथील राहते घराचे स्वयंपाक खोलीत छताचे हुकला इलेक्ट्रिक ताराने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकरण 16 एप्रिल चे सकाळी उघडकीस आल्याने याची सूचना गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळताच तेथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतकाचे प्रेत केटीएस रुग्णालय गोंदिया येथे शव विच्छेदना करता पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास हवालदार चौधरी करीत असून आत्महत्येचे कारण अज्ञात असले तरी मानसिक तणावातून चालक खोमेद्र पारधी यांनी आत्महत्या केली असावी असा कयास लावल्या जात आहे.
गोंदिया आगाराच्या चालकाची आत्महत्या
RELATED ARTICLES