गोंदिया : गोंदिया जिल्हा पंचायत समिती सदस्य संघटनेच्या अध्यक्षपदी देवरी पंचायत समितीचे उपसभापती अनिलकुमार बिसेन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सचिव पदी आमगाव पंचायत समितीचे पंचायत समिती सदस्य इंजिनीयर तारेन्द्र रामटेके व जिल्हा संघटक म्हणून गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे यांची निवड करण्यात आली.
संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी गोंदिया पंचायत समितीचे प.स. सदस्य शंकरलालजी टेंभरे,सडक अर्जुनी पंचायत समितीचे उपसभापती कापगते,महिला उपाध्यक्षपदी सालेकसा पंचायत समितीच्या सदस्या अर्चनाताई ताराम यांची निवड करण्यात आली.कोषाध्यक्ष म्हणून सालेकसा पंचायत समितीचे पंचायत समिती सदस्य जितेंद्र बल्हारे यांची निवड करण्यात आली.संघटनेच्या माध्यमातून शासनाचे पंचायत समिती सदस्याकडे लक्ष केंद्रित करणे हा उद्देश आहे. विविध प्रकारच्या मागण्यावर चर्चा करुन नगरपंचायत मधील फक्त 150 मतदार असलेल्या व्यक्तींना विधान परिषदेवर मतदानाच्या अधिकार आहे.परंतु जो 12 000 लोकसंख्येचा नेतृत्व करतो अशा लोकप्रतिनिधीला विधानपरिषदेत मतदानाच्या अधिकार नाही.एवढेच नाही तर ज्या प्रकारे नगरपंचायतच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून विधान परिषदेला आमदार पाठविण्यात येतात. त्याच प्रकारे पंचायत समिती गटामधून सुद्धा महाराष्ट्रामध्ये चार आमदार पाठविण्यात यावे अशी मागणी बैठकीत करण्यात आली. पंचायत समिती सदस्यांना वैयक्तिक निधी कसल्याही प्रकारच्या दिला जात नाही तरी शासनाच्या लक्ष केंद्रित करून पंधरावा वित्त आयोग मध्ये 20% हा पंचायत समितीला असावा 70% ग्रामपंचायतीला व 10% जिल्हा परिषदेला निधि देण्यात यावे अशा अनेक विविध प्रकारच्या मागण्या शासनासमोर संघटनेच्या माध्यमातून ठेवण्यावर चर्चा करण्यात आली.
गोंदिया जिल्हा पंचायत समिती सदस्य संघटनेच्या अध्यक्षपदी उपसभापती अनिल बिसेन
RELATED ARTICLES