प्रतिनिधि। गोंदिया- जिल्ह्यातील खाजगी रुग्णवाहिकेचे भाडे दर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चीत केले आहेत. सर्व खाजगी रुग्णवाहिका धारकांनी भाडे दरपत्रक सोबत बाळगावे व रुग्णालय प्रशासनाने हे दरपत्रक आपल्या रुग्णालयात दर्शनी भागात लावावे असे निर्देश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिले आहेत.
खाजगी रुग्णवाहिक सेवेचा लाभ घेणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांनी निश्चित भाडे दराप्रमाणेच भाडे द्यावे. तसेच अवाजवी भाडे आकारणाऱ्या अथवा सेवा नाकारणाऱ्या खाजगी रुग्णवाहिका धारकांनी तक्रार करावी असे आवाहन त्यांनी केले.
रुग्णवाहिकेचे दर
गोंदिया नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये 1 ते 25 किलोमीटर पर्यंत मारुती 800 रुपये, टाटा सुमो-इको 950 रुपये, विंगर 1500 रुपये, टेम्पो ट्रॅव्हलर 2200 रुपये व कर्डीक बीएलएस 4500 रुपये. हे दर इंधनासहित असून रुग्णवाहिकेमध्ये वातानुकुलीत यंत्रणा बसविली असल्यास निश्चीत भाडेदरापेक्षा दहा टक्के वाढ ग्राह्य असेल.
गोंदिया नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये किंवा हद्दीबाहेर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी मारुती 15 रुपये, टाटा सुमो-इको 16 रुपये, विंगर 22 रुपये, टेम्पो ट्रॅव्हलर 29 रुपये व कर्डीक बीएलएस 4500 रुपये. हे दर इंधनासहित असून रुग्णवाहिकेमध्ये वातानुकुलीत यंत्रणा बसविली असल्यास निश्चीत भाडेदरापेक्षा दहा टक्के वाढ ग्राह्य असेल.
एका महिन्याचे दोन हजार किलोमीटर पर्यंतचे भाडे मारुती 47 हजार रुपये, टाटा सुमो-इको 49 हजार 500 रुपये, विंगर 59 हजार रुपये, टेम्पो ट्रॅव्हलर 64 हजार रुपये व कर्डीक बीएलएस 75 हजार रुपये. हे दर इंधनासहित असून रुग्णवाहिकेमध्ये वातानुकुलीत यंत्रणा बसविली असल्यास निश्चीत भाडेदरापेक्षा दहा टक्के वाढ व दोन हजार किलोमीटर पुढील प्रत्येक कि. मी. वाहन भाडेदर प्रती किलोमीटर 10 रुपये प्रमाणे राहील.
00000