खा.प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने पयर्टन विकासाला चालना
गोंदिया : राज्य शासनाच्या पयर्टन व सांस्कृतिक विभागाने गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्हयातील 3 तिर्थक्षेत्राच्या पयर्टन विकासासाठी 2 कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. यामुळे गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्हाच्या विकासासाठी खा.प्रफुल पटेल यांच्या विकासात्मक कटीबध्द्तेच्या श्रृंखलेत पयर्टन विकासाच्या माध्यमातून भर पडणार आहे. खा. प्रफुल पटेल यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य
शासनाने पयर्टन विकासाच्या कामांना मंजुरी दिल्यामुळे गोंदिया जिल्हयातील प्रतापगढ व नागरा तिर्थक्षेत्र स्थळ तर भंडारा जिल्हयातील चांदपुर देवस्थान या तिर्थक्षेत्रांना विकासाचा नवा आयाम प्राप्त होणार आहे. विशेष म्हणेज, या संदर्भात माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी खा.श्री प्रफुल पटेल यांचे कडे सतत पाठपुरावा केला होता. गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्हायाच्या सर्वांगिण विकास घडवुन यावा यासाठी खा.पटेल हे योग्य नियोजन करून सतत प्रयत्नरत राहतात. त्यातच क्षेत्रातील नागरिकांची भौतिक सुविधा आणि पयर्टन, तिर्थक्षेत्र स्थळाच्या पायाभुत सुविधा अधिक सुव्यवस्थीत व्हावा यासाठी देखील त्यांचे प्रयत्न राहते. या अंतर्गत गोंदिया जिल्हयातील नागरा व प्रतापगढ तर भंडारा जिल्हयातील प्रसिध्द् तिर्थक्षेत्र स्थळ चांदपुर या तिन्ही ठिकाणी पयर्टनाला वाव मिळावे या उद्देश्याने माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी सुचविलेल्या कामांचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करण्यात आले. या संदर्भात खा.पटेल यांनी राज्य शासनाशी सतत पाठपुरावा केले. परिणामी राज्य शासनाच्या पयर्टन व सांस्कृतिक विभागाने 31 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करून गोंदिया -भंडारा जिल्हयातील पयर्टन विकासासाठी प्रत्येकी 1 कोटीच्या निधीचा कामांना मंजुर प्रदान केलेली आहे. मंजुर कामांना साठी प्रत्येकी 25 लक्ष रुपयाचा निधी ही जिल्हा प्रशासनाकडे वितरीत करण्यात आलेली आहे. यामुळे लवकरच तिन्ही तिर्थक्षेत्रात पयर्टन विकासाचे कामांना सुरुवात होणार आहे. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने व माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांच्या प्रयत्नाने तिर्थक्षेत्राच्या विकास कामांना चालना मिळणार आहे. याबद्दल जिल्हयातील भाविकांकडून खासदार श्री प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे.
नागरा व प्रतापगड पर्यटन विकासासाठी 1 कोटीची कामे
राज्य शासनाच्या पयर्टन व सांस्कृतिक विभागाकडून खासदार श्री प्रफुल पटेल यांनी सुचविलेल्या पयर्टन विकासाच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये गोंदिया जिल्हयातील नागरा पयर्टन स्थळ येथे शिव मंदीर समोर शेड बांधकामासाठी 30.00 लक्ष रुपये, भैरव मंदीर समोर किचन शेड बांधकामासाठी 25.00 लक्ष रुपये तसेच प्रतापगढ पयर्टन स्थळ येथे पहिल्या पायरी परिसरात रस्ता रुंदीकरण करीता 25.00 लक्ष रुपये व दरगाह पोच मार्ग रुंदीकरण करीता 20.00 लक्ष रुपयाच्या कामांना मंजुर देण्यात आलेली आहे. भंडारा जिल्हयातील चांदपुर पयर्टना विकासासाठी 1 कोटी ची कामे गोंदिया जिल्हा प्रमाणे भंडारा जिल्हयातील प्रसिध्द् तिर्थक्षेत्र तथा पयर्टन स्थळ चांदपुर च्या विकासासाठी 1 कोटीची निधी मंजुर करण्यात आलेली आहे. यामध्ये मंदीर कडे जाणाऱ्या पायऱ्यावर प्रोफाईल शेड बांधकाम 30.00 लक्ष रुपये व देवस्थान जवळ असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरणासाठी 70.00 लक्ष रुपये असे एकुण 1 कोटी च्या कामांना मंजुरी मिळालेली आहे.