गोंदिया : जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी 20 मार्च रोजी घरफोडीच्या गुन्ह्यातील 2 गुन्हेगारांना प्रत्येकी 3 वर्षाचा सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सागर यशवंत लिल्हारे, (28) व नितेश देवराज आंबेडारे (24) दोन्ही रा. पारडीबांध असे आरोपींची नावे आहे.
गोंदिया शहरातील प्रभू मार्गावरील अमित चंदानी यांच्या मोबाईल दुकान फोडून अज्ञात आरोपींनी 77 हजार 80 रुपयांचे मोबाईल चोरी केल्याची घटना 22 ऑक्टोबर 2017 रोजी घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी कलम 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करुन तपासादरम्यान आरोपी सागर लिल्हारे व नितेश आंबेडारे याला अटक केली होती. दरम्यान साक्षपुराव्यासह मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करुन फौजदार खटला चालविण्यात आला. सुनावनीदरम्यान दोन्ही आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी आरोपींना प्रत्येकी 3 वर्षाचा सश्रम करावास व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक नार्वेकर यांनी केला. खटल्याचा युक्तीवाद सहायक सरकारी अभियोक्ता सुरेश रामटेके यांनी केले. तसेच न्यायालयीन कामकाज पोलिस हवालदार ओम राज जामकाटे यांनी पाहिले.
घरफोडीच्या गुन्ह्यात दोन आरोपींना 3 वर्षाचा कारावास
RELATED ARTICLES