प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे सफल 16 स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया
गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यात चिखली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वीत झाल्याने चिखलीवासीयांची तब्बल 20 कि.मी.पायपीट वाचली आहे.चिखली ग्रामवासियांना कुठलीही आरोग्यविषयक त्रास झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी येथे पायी जावे लागत होते.जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे सर्व प्राथमिक आरोग्याच्या सोयी उपलब्ध करुन दिल्याने चिखली ग्रामवासियांच्या अडचणी दुर झालेल्या आहेत.लोकांना आरोग्याबाबत नियमित लसीकरण, माता व बाल संगोपन, साथरोग, हिवताप, क्षयरोग,कुष्ठरोग,सिकलसेल,मानव विकास शिबीर, कुटुंब कल्याण सेवा ई.विविध आरोग्य कार्यक्रम व योजनाबाबत आरोग्य शिक्षण,औषधोपचार व संदर्भसेवा असे विविध आरोग्याच्या सुविधा मिळु लागल्या आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश दोनोडे यांचे दुरद्रुष्ट नियोजन व त्यांचे आरोग्य संस्थेचे कर्मचारी यांचे काम करण्याबाबतचा लगाव यामुळे कार्यक्षेत्रातील लोकांना राष्ट्रीय आरोग्य कार्यक्र्माचा लाभ गावातच मिळू लागला आहे. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत दि.25 सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे कुटुंब कल्याण नसबंदी शस्त्रक्रिया कॅंम्पचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 16 स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया सफल पार पडली.शस्त्रक्रिया सर्जन डॉ.शुभम लंजे यांनी केल्या. शस्त्रक्रिया कॅंप यशस्वी होण्याकरिता तालुका आरोग्य अधिकारी तिरोडा डॉ.प्रणित पाटील व प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश दोनोडे व डॉ.वंदना घरोटे यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे पार पडले. कॅंप प्रंसगी वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश दोनोडे व डॉ.वंदना घरोटे,आरोग्य सेविका बिसेन,शेख,घोडके,कुलमाटे,मातकर,नागदेवे यांचे सह परिचर मेघनाथ चुटे व बोंबार्डे यांनी आरोग्य सेवा प्रदान केली.
चिखलीवासीयांची तब्बल 20 किमी पायपीट वाचली
RELATED ARTICLES