चिचगड पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले युवकाचे प्राण
गोंदिया : देवरी तालुक्यातील चिचगड येथील तुलसीदास सूरज धानगाये, वय ३३ वर्षे हा युवक अनेक दिवसा पासुन मानसिक तणावात होता. घटनेच्या दिवशी तो स्वतः एक चाकू हातात घेऊन घरांमधे व मोहल्ल्यात फिरत होता.त्याच्या हातातील चाकूने तो स्वतःला जखमी करून एका रूम मध्ये स्व:ताला डाबून घेतले असल्याचे माहिती त्याच्या आई वडिलांनी चिचगड येथील ग्रामपंचायत सदस्या शाहीन सैयद यानां दिली. शाहीन यांनी फोन द्वारे चिचगड पोलिस स्टेशन येथे संपर्क साधून घटनेची माहिती तात्काळ ठाणेदार शरद पाटील यांना दिली. श्री पाटील हे स्टाफ सह घटना स्थळी पोहचले आणि तुलसीदास याला समुपदेशन करूण प्राण वाचविले. अशाप्रकारे चिचगड पोलीसांच्या सतर्कतेने या युवकाचे प्राण वाचविण्यात पोलीसांना यश मिळाले.
प्रकरण असे की चिचगड येथील एक युवक तुलसीदास सूरज धानगाये,वय-३३ वर्ष चिचगड,हा मानसिक तान तणावात होता व मागील चार दिवसापासून झोपला नाही. घटनेच्या दिवशी तो स्वतः एक चाकू हातात घेऊन घरांमधे व मोहल्ल्यात फिरत होता. सदर युवकाचे आई व पत्नी यांनी त्याला समजाऊन सुध्दा तो कोणाचेही ऐकत नव्हता. त्याच्या हातातील चाकूने तो स्वतःला जखमी करून घेत आहे अशी माहिती चिचगड येथील सामाजिक कार्यकर्त्या तथ ग्रा.पं. सदस्य-शाहीन सैयद,यांना मिळताच त्यांनी पोलिस ठाण्यात फोन केला. नंतर तात्काळ ठाणेदार शरद पाटील हे स्टाफ सह अंमलदार तेजराज कोठेही, कमलेश शहारे, संदीप तांदळे यांच्यासह घटनास्थळी पोहोचले.
सदर युवकाने स्वतःला एका रूम मध्ये डांबून घेतले आहे व हातातील चाकूने तो स्वताच्या हातावर कापून घेत आहे. त्याने शरीरावर ईतर ठिकाणी सुध्दा स्वतःला जखमा करून घेत आहे लागलीच ठाणेदार यांनी अंमलदार यांच्या मदतीने बंद रूम चा दरवाजा तोडला व त्या युवकाला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भर्ती केले. सदर युवकाला ठाणेदार शरद पाटील यांनी योग्य प्रकारे त्याचे समुपदेशन केले व भविष्यात असे पाउल उचलले जाणार नाही यासाठी त्याला सकारात्मक विचार करून जीवनाला सामोरे गेले पाहिजे असे मार्गदर्शन केले तसेच त्याच्या भाऊ आई यांना त्याला चांगल्या हॉस्पिटल मध्ये त्याच्यावर योग्य उपचारासाठी दाखल करा. यात काही मदत लागली तर कळवा असे सांगितले. यावेळी सामजिक कार्यकर्त्या व ग्रामपंचायत सदस्या शाहीन सैयद यांनी पोलीस विभागाचे कौतूक करून आभार मानले.
चिचगड येथील युवकावर मानसिक तणाव… स्वता:वरच केला चाकुने वार
RELATED ARTICLES