गोंदिया : नवेगावबांध पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो पिकप क्रमांक एम एच ए 36 AA 3017 किमती 600000/-रु. 2) 17 नग गोवंशाची जनावरे लहान मोठी जनावरे किमती 1,39,000/-रु असा एकुण 7,39,000/- रुपयेचा माल मौजा भिवखिडकी गावाअगोदर नाल्याजवळ पकडण्यात आला. प्रकरण अशा प्रकारे आहे की वरील घटना ता वेळी व ठिकाणी यातील आरोपीने आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकप क्रमांक एम एच 36 AA 3017 मध्ये 17 जनावरे कत्तलीकरिता घेऊन जातानी. त्यांना कोणताही चारापाण्याची व्यवस्था न करता दोराने पायांना तोंडांना करकच्च बांधून दाटीवाटीने कोंबून व कोणतेही वैद्यकीय परीक्षन न करता निर्दयतेने कत्तली करिता कत्तलखान्यात घेऊन जातानी मिळून आल्याने अज्ञात आरोपी हा फरार झाल्याने फिर्यादी यांचे लेखी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात आहे.
जनावरांचा वाहन पकडला, 7.39 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
RELATED ARTICLES






