आमदार कोरोटे यांचा जिल्हा शल्य चिकीत्सकांना सुचना
या जिर्ण ईमारतीच्या स्लैब मधून पाणि गळत असल्याने मोठी दुर्घटनेची शक्यता
गोंदिया : देवरी शहरातील ग्रामीण रूग्णालयातील जिर्ण ईमारतीच्या स्लैब मधून रूग्णांच्या खाडावर पावसाचे पाणि गळत असल्याची माहिती या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांना मिळताच त्यांनी नुकतेच या रूग्णालयात जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली. येथील अवस्थे बाबद नाराजी व्यक्त करीत उपस्थित वैद्यकिय अधिका-यांना व कर्मचा-यांना खडेबोल सुनावले. तसेच भविष्यात हा जिर्ण स्लैब रूग्णांच्या अंगावर कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी नजीक असलेल्या रूग्णालयाच्या नवीन ईमारतीमध्ये १५ आगस्टपूर्वी या रूग्णांना सिप्ट करा अन्यथा मी स्वता:च या नवीन ईमारतीचे लोकार्पण करून रूग्णांना या ईमारतीमध्ये सिप्ट करणार असल्याचा ईशारा व सुचना जिल्हा शल्यचिकीत्सक व येथील वैद्यकिय अधिका-यांना दिल्याची माहिती आमदार कोरोटे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
सविस्तर असे की, आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या देवरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव राहतात. या तालुक्यात त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाने देवरी शहरात ग्रामीण रूग्णालय स्थापन केले.परंतू या रूग्णालयातील ईमारत पूर्णता: जिर्ण झाली आहे. या ईमारतीच्या स्लैब मधून पावळ्यात रूग्णांच्या खाटावर पाणि गळत राहते. खाटावरती स्लैबच्या खाली प्लास्टीक ची पन्नी बांधून येथील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी हे थातूरमातूर व्यवस्था करून रूग्णांच्या जिवाशी खेळ करीत असल्याचे आमदार कोरोटे यांच्या पाहणीत समोर आले आहे.
या पाहणी दरम्यान असे निदर्शनात आले की, य रूग्णालयात मोठ्याप्रमाणातवर रूग्ण उपचारार्थ भर्ती आहेत. इथली अवस्था म्हणजे या रूग्णाच्या खाटावरती स्लैबच्या खालीप्लास्टीक ची पन्नी बांधून ईथले काम चालविण्यात येत आहे. मागच्यावर्षी आणि यावर्षी सुध्दा येथील अवस्था जसीच्या तसी आहे. ही परिस्थिती मोठी भायावह आहे.भविष्यात जर मोठा पाऊस आलातर या ठिकाणी रूग्णांच्या अंगावर जिर्ण स्लैब कोसळून मोठा अपघात होउ शकतो.
तर दुसरीकडे या रूग्णालयाच्यानजीक रूग्णालयाची मोठी ईमारत पूर्णात्वास आली आहे.परंतू या ईमारती मध्ये विद्यूत पुरवठ्याची कामे पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या ईमारतीचे लोकार्पण रखळले आहे. जर १५ आगस्टपूर्वी या ईमारतीत विद्यूत पुरवठा सुरळीत करूण जिर्ण ईमारतीच्या रूग्णांना नवीन ईमारतीमध्ये सिप्ट केले नाही तर मी स्वता:च या नवीन ईमारतीचे लोकार्पण करून येथील रूग्णांना नवीन ईमारतीमध्ये सिप्ट करणार असल्याचा ईशारा व सुचना जिल्हा शल्य चिकीत्सक व येथील वैद्यकिय अधिका-यांना दिल्याचे आमदार सहषराम कोरोटे यांनी प्रसार माध्यमांना सांगीतले.
जिर्ण ईमारतीच्या रूग्णांना १५ आगस्टपूर्वी नवीन ईमारतीमध्ये सिप्ट करा
RELATED ARTICLES