Tuesday, October 15, 2024
Google search engine
HomeUncategorizedजिल्हयातील बलस्थाने मजबूत करा : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

जिल्हयातील बलस्थाने मजबूत करा : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

गोंदिया : जिल्ह्यातील विविध विकास कामावर भर देवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील बलस्थाने मजबूत करा, अशा सूचना राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी दिल्या.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे विविध योजनांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नागपुरचे प्रभारी विभागीय आयुक्त डॉ.विपीन इटनकर, जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरूगनाथम, उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, औद्योगीक संघटनेचे पदाधिकारी, आदिवासी समुदायाचे प्रतिनीधी, उमेद व अंगणवाडी महिला प्रतिनीधी, राजकिय पक्षाचे प्रतिनीधी तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विविध योजनांची व विकासाची माहिती सादर केली. गोंदिया जिल्ह्यामध्ये आदिवासी विभागाच्या वतीने एकलव्य शाळा वाढविण्यावर भर देवून आदिवासी भागासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना जास्तीत जास्त प्रमाणात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गोंदिया जिल्ह्यामध्ये पर्यंटन विकसीत होण्यासाठी प्रतापगड, नागझिरा, नवेगावबांध येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. यासाठी जिल्ह्याच्या पर्यटनासाठी आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना, सारस पक्षी, आदिवासी विकास योजना आदी योजने विषयी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments