Friday, January 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedतिरोडा शहरातील अपघातप्रवण मार्गावर CCTV बसविण्याची मागणी

तिरोडा शहरातील अपघातप्रवण मार्गावर CCTV बसविण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन
गोंदिया. शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील सुकडी नाका ते चंद्रभागा नाका हा मार्ग वाढत्या वाहतूक कोंडी व अपघातांमुळे अत्यंत धोकादायक होत चालल्याने, या मार्गावर तातडीने सर्व्हिलन्स CCTV कॅमेरे बसविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली.
शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी पक्षाच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने तिरोडा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झेलकर यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. मागील काही महिन्यांत या परिसरात वेगमर्यादा उल्लंघन, अनियंत्रित वाहनचालक, ओव्हरटेकिंग आणि वाहतूक कोंडीमुळे अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शाळा, व्यावसायिक केंद्रे आणि पादचारींची मोठी वर्दळ असल्याने या मार्गावर तत्काळ CCTV कॅमेरे बसविणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. कॅमेऱ्यांमुळे वाहतूक नियंत्रण सुलभ होईल, वेगमर्यादेवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल आणि अपघात तपासासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध होतील, असा पक्षाचा दावा आहे. तसेच, संबंधित मार्गावर वाहतूक पोलिसांची गस्त वाढविणे, वाहतूक शिस्तीबाबत जागृती करणे आणि धोकादायक ठिकाणी आवश्यक ते उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.निवेदन स्वीकारताना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी विषय गांभीर्याने तपासून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिल्याचे पक्षाच्या प्रतिनिधींनी सांगितले.यावेळी तालुका कार्याध्यक्ष तथा जिल्हा महासचिव नासिर घाणीवाला,संदीप पाटील,मंगेश गेडाम,चरणदास भाजीपाले,निरज गजभिये,केतन रामटेके,डीलेश बिसेन,यंद्रराज वासनिक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments