Friday, July 19, 2024
Google search engine
HomeUncategorizedत्या आरोपीला 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

त्या आरोपीला 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

गोंदिया : 12 फेब्रुवारी 2022 रोजीच्या रात्री दरम्यान बाजपेई चौक गोंदिया येथे फिर्यादी विजय कुमार चंद्रकुमार भक्तांनी राहणार सिंधी कॉलनी गोंदिया यांचे दुकानाचे कुलूप तोडून दुकानाती सामान व नगदी असा एकूण किमती 66 हजार रुपयाचा ऐवज चोरून नेल्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे अप क्रमांक 127/2022 कलम 457, 380 भांदवी अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचे तपास दरम्यान घरफोडी करणारा आरोपी नामे धर्मराज दागोजी बावनकर वय 30 वर्ष रा. गौतमनगर, गोंदिया जिल्हा गोंदिया यास गुन्हयात अटक करण्यात आली.
सदर गुन्हयाचे तपासाअंती सबळ साक्ष पुरावे वरून मा. न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. आणि मा. मुख्य न्यायदंडा धिकारी, न्यायालय गोंदिया, येथे फौजदारी खटला क् 171/2022 प्रमाणे खटला चालविण्यात आला. सदर खटल्याचे सुनावणी दरम्यान आरोपी नामे धर्मराज दागोजी बावनकर वय 30 वर्ष रा. गौतमनगर, गोंदिया जिल्हा गोंदिया हा सबळ साक्ष पुरावे व युक्तिवादानंतर दोषी आढळल्याने दिनांक 03 मार्च 2023 रोजी मा. मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी, सो. कोर्ट गोंदिया, यांनी सदर आरोपीस 5 वर्षे सश्रम कारावास व 2 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. सदर शिक्षा झालेल्या गुन्ह्याचा तपास पो. हवा. जागेश्वर ऊईके यांनी केलेला असून खटल्याचा युक्तीवाद सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुरेश रामटेके तसेच न्यायालयीन कामकाज पो. शि. किरसान यांनी पाहीले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments