गोंदिया : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम 2006 आणि 2008 व सुधारित नियम 2012, सामुहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय कन्व्हर्जन समिती स्थापन करण्यात आली आहे. देवरी तालुक्यातील एकूण 69 गावांना सामुहिक वनहक्क कायद्यानुसार पट्टे प्राप्त झाले असून सदर गावांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्याच्या दृष्टीने प्रकल्प अधिकारी तथा तालुका कन्व्हर्जन्स समितीचे अध्यक्ष विकास राचेलवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.
आदिवासी विकास विभागाचे दिनांक 12 सप्टेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे वननिवासी व इतर पारंपारिक वननिवासी यांच्या फायदयासाठी सामुहिक वनसंपत्तीचे निरंतर व समसमान व्यवस्थापन करणे तसेच वनावर उपजिविका अवलंबून असलेल्या ग्रामीण समाजाला निरंतर व शाश्वत उपजिविका साधन उपलब्ध करुन देणे व वनाचे नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, संरक्षण व पुनर्निर्माणाकरीता व कार्यक्षम व्यवस्थापन पध्दत अवलंबविणे आवश्यक असल्याचे श्री. राचेलवार यांनी सांगितले. सभेला देवरी व चिचगडचे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच तालुका कृषि अधिकारी व तालुकास्तरीय कन्व्हर्जन्स समितीचे अशासकीय सदस्य व 69 सामुहिक वनहक्क प्राप्त गावातील ग्रामसभांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी हरिश्चंद्र सरियाम यांनी मानले.
देवरी तालुक्यातील 69 गावांना सामुहिक वनहक्क पट्टे
RELATED ARTICLES