बाजार पावती व विमाच्या पावतीमध्येही होतेय घोळ
गोंदिया : राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्थार्जनाच्या पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने नाविन्यपुर्ण योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन दुधाळ गाई/म्हशी वाटप योजना नागपूर येथील पुरवठादाराच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.ही योजना राबवितांना मात्र शेतकरी सर्वसामान्य लाभार्थ्याची मोठी कोंंडी केली जात असल्याचे चित्र गोंंदिया तालुक्यातील सावरी येथील वितरण केंद्रावर बघावयास मिळाले.
त्यातच जिल्ह्याकरीता ज्या कंत्राटदार पुुरवठादाराची नियुक्ती राज्यसरकारच्या पशुसंवर्धन विभागाने केली आहे,ते गोंदिया जिल्ह्याचे पुरवठादार श्री कडू यांनी आपल्या आधी मोठ्याप्रमाणात ही योजना राबवितांना गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवला आहे.त्या गैरव्यवहारावर आळा घालण्याकरीता आपली निवड झाल्याचे सांगत आपल्याला गैरव्यवहार चालत नसल्याचे सांगायला ते मात्र विसरले नाही.
आज 1 सप्टेंबरला अर्जुनी मोरगाव,गोरेगाव व आमगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना गटवाटप करण्यात आले.यामध्ये अर्जुनी मोरगाव 3,गोरेगाव 4 व आमगाव येथील 1 गटाला गायींचे दोन प्रमाणे वितरण करण्यात आले.पुुरवठादार कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आज 28 संंकरीत गाय लाभार्थ्यांना वितरीत करण्याकरीता आणले होते.त्यानुसार 8 गटांना 16 गायींचे वितरण झाले.तर 12 गाय (6 गट)शिल्लक राहायला हवे होते.परंतु ही प्रकिया संपेपर्यंत त्याठिकाणी एक गट म्हणजे 2 गायीच शिल्लक राहिल्याचे दिसून आले.तर 10 गायी कुठे गेल्या हा सुध्दा प्रश्न उपस्थित झालेला आहे.सोबतच लाभार्थ्यांना 80 हजार रुपयाचा गायी मिळत असले तरी बाजारभावाप्रमाणे तिथे बोली होत नसून 80-95 हजाराच्यावर किमंत ठरवून लाभार्थ्याकंडून वरची किमंत घेतली जात असल्याचे तेढा तुमसर येथील लाभार्थी शहारे यांनी सांगितले.विम्याची रक्कमही शासन भरत असताना लाभार्थ्याकंडूनही वसुल केले जाते.त्यातच बिल्ला लावतांनाही 1000-2000 रुपयापर्यंतची लूट आणि बाजार पावतीमध्ये सुध्दा लुट केली जात असल्याचे चित्र या योजनेच्या वाटपावेळी दिसून आले.लाभार्थ्यांना गाय वाटप करतांना विभागाच्यावतीने कोर्या फार्मवर स्वाक्षरी घेतले जात असल्याचेेही चित्र होते.
नाविन्यपुर्ण योजनेत गायींची किंमत वाढवून लाभार्थ्यांची होतेय लूट?
RELATED ARTICLES