पंकज यादव यांनी जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन
गोंदिया : मागील दोन दिवसांपासनू गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे अन्य लागवड केलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमालाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली असून त्यांचे खुप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. सदर शेतकऱ्यांचे शेतमालाच्या नुकसानीचे पंचनामे तयार करून संबंधित संक्रोस आदेश पारीत करून, शेतकऱ्यांना आर्थिक मदत ताबडतोब मिळवून देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदत करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख पंकज एस. यादव यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनातून केली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तयार करून मदत करा
RELATED ARTICLES