Wednesday, February 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंतगाच्या मांज्याने गळा चिरल्याने बारा वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत, देवरी शहरातील पहिली...

पंतगाच्या मांज्याने गळा चिरल्याने बारा वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत, देवरी शहरातील पहिली घटना

गोंदिया. मकरसंक्रातीचा सण फक्त महाराष्ट्रातच नव्हे देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तिळगुळाचे लाडू आणि पतंग.. ही सणाची दोन खास वैशिष्ट्य आणि सर्वांनाच आवडणारी. पंतग उडवण्याचा आनंद लहनांपासून मोठ्यापर्यंत अनेक लोक घेतात. पण त्याचा पतंगाचा मांजा हा काहींसाठी प्राणघातकही ठरू शकतो. मांज्याने हात कापला, तर कधी रस्त्यावरून जाताना मांज्यामुळे गळा कापून लोक जखमी झाल्याच्या अनेक घटना आपण दरवर्षी ऐकतच असतो. यंदाही मकरसंक्रात सुरू होण्यापूर्वी पासूनच लोकांमध्ये पतंग उडवण्याचा उत्साह दिसत होता. मात्र याच पतंगाच्या मांज्यामुळे अनेक दुर्घटनाही होताता हे आपण बघीतल आहे. असीच घटना देवरी शहरात घडली आहे. पतंगाच्या मांज्याने एका बारा वर्षाच्या मुलाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना आज मकरसंक्रातीच्या दिवसी समोर आली आहे. मकरसंक्राती निमीत्त साळेला सुट्टी असल्याने बारा वर्षाचा मुलगा आपल्याच घरावरील छतावर आकाशात उळनारी पंतग बघीत असतांना त्या मुलाच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकला आणि गळ्यावर गंभीर जखम झाली. सुदैवाने पंतगीचा धाग्याने त्या मुलाचा गळा खोलवर न कपल्याने मोठी दुर्घटना टळली, मात्र तरीही गळा कपल्याने त्याला देवरी शहरातीलच जवळच्याच रुग्णालयात उपचार करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवरी शहरात राहणारा शमिष तागडे असे त्या जखमी मुलाचे नाव असून आज (दि.14 जानेवारी 2025) दुपारच्या दरम्यान घरच्या छतवर आकाशात उडनारी पंतग बघीत असतांनी एका पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याभोवती आवळला गेला आणि गळ्यावर चिर पडली. आरडा ओरडा झाल्यानंतर घरच्यांनी लगेच गळ्यातील मांजा काढत स्थानिक रुग्नालयत नेत प्राथमिक उपचार करन्यात आला. मांजा गळ्याचा खोलवर न गेल्याने मोठा अनर्थ टळला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments