Thursday, December 5, 2024
Google search engine
HomeUncategorizedपर्यावरण संवर्धनाचा जिल्हा परिषदेचा संकल्प

पर्यावरण संवर्धनाचा जिल्हा परिषदेचा संकल्प

जागतिक पर्यावरण दिन : सर्वसाधारण सभेत मा. अध्यक्ष, मा. सभापतीसह सदस्यांची घेतली शपथ
गोंदिया : वातारणात वेगवेगळे बदल होवू लागले. त्यामुळे जैवविविधताच धोक्यात आली आहे. परिणामी पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पर्यावरणाचा संकल्प करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त तशी शपथ सभागृहात घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. पंकज रहांगडाले यांनी संपूर्ण सभागृहाला पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली.
जिल्हा परिषद गोंदियाचे उपाध्यक्ष मा. श्री. इंजि. यशवंत गणवीर, बांधकाम समितीचे सभापती मा. श्री. योपेंद्रसिह टेंभरे, कृषी व पशूसंवर्धन समितीचे सभापती मा. श्री. रूपेश कुथे, समाजकल्याण समिती सभापती मा. श्रीमती पुजा अखिलेश सेठ, महिला व बालकल्याण समितीचे सभापती श्रीमती सविता पुराम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती शितल पुंड, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या प्रकल्प संचालक मा. श्रीमती प्रमिला जाखलेकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. नरेश भांडारकर यावेळी मंचावर उपस्थित होते. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सदस्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात जनजागृतीवर भर देण्याचे आवाहन याप्रसंगी जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले.
दैनंदिन जीवनशैलीत पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेणे. याकरीता प्लास्टीक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करणे. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे. त्याची बचत करणे. घरातिल ओला-सुका कचरा वेगळा करणे. सभोवतालच्या नैसर्गीक जलस्रोतांचे म्हणजे विहीर, तळे तसेच नद्यांचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे. परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे. नैसर्गीक अधिवासात वास्तव्य करणारे प्राणी, पक्षी जलचर व जैवविविधतेच रक्षण करणे. आपल्या वाढदिवसाला किमान एक झाड लावून त्यांचे संगोपण करणे. तथा आपले आयुष्य पर्यावरण पुरक व्यतित करण्याचा देखील शपथेतून संकल्प करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित जिल्हयातील सर्व जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य, पंचायत समितींचे सभापती, विविध विभागांचे विभागप्रमुख यांनी याप्रसंगी शपथ घेतली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती शितल पुंड यांनी शपथेचे वाचन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments