Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedपुरवठा विभागाचे निरिक्षण अधिकारी विनोद काळेंची तांत्रिक अधिकारीपदी पदोन्नती

पुरवठा विभागाचे निरिक्षण अधिकारी विनोद काळेंची तांत्रिक अधिकारीपदी पदोन्नती

गोंदिया : अर्जुनी मोरगाव येथील तहसील कार्यालयाचे पुरवठा विभागाचे निरिक्षण अधिकारी विनोद काळे यांची नागपुर येथील उपआयुक्त कार्यालय पुरवठा विभाग येथे तांत्रिक अधिकारी या पदावर पदोन्नती झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.पुरवठा निरिक्षण अधिकारी विनोद काळे यांनी अर्जुनी/मोरगाव उपविभागामध्ये अर्जुनी/मोरगाव व सडक/अर्जुनी या दोन्ही तहसील कार्यालयात पुरवठा निरिक्षण अधिकारी म्हणुन उत्कृष्ट काम केले आहे.
2023 यावर्षी नाशिक आयएसओ नामांकन समिति चे अध्यक्ष नरेन्द्र गंगाखेडकर यांनी दि.8 फेब्रुवारी रोजी अर्जुनी/मोरगांव येथे 75 रास्तभाव दुकानाची आयएसओ सुची नुसार तपासणी केली असता आयएसओ नामांकनच्या दृष्टीने काळे यांनी केलेल्या सर्व बाबी अद्यावत दिसुन आल्या. त्यानतंर पुरवठा कार्यालयाची पाहणी करत कार्यालयाला पण आयएसओ नामांकन प्राप्त झाले होते.त्यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी धंनजय देशमुख, पुरवठा निरिक्षण अधिकारी विनोद काळे व पुरवठा निरीक्षक मुकुंद माहूरे,भुषण राऊत,पकंज तवळे हे सुध्दा उपस्थित होते.काळे यांनी केलेल्या कार्यामुळेच अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील सर्वाधिक 75 रेशन दुकानांना आयएसओ नामांकन मिळाले आहे.राज्य शासनाच्या पुरवठा विभागाने काळे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती देत नागपुर उपायुक्त पुरवठा कार्यालयात तांत्रिक अधिकारी पदावर पदोन्नती केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments