बालकांच्या लसीकरणासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य
गोंदीया : जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील प्रत्येक बालकांच्या लसीकरणासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक बालकाचे लसीकरण होण्यासाठी ग्रामपंचायतीनी पुढाकार घेऊन काम करावे जेणे करुन कुपोषण मुक्त ग्राम संकल्पना राबिण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती मा. यशवंतजी गणवीर यांनी केलेले आहे. दि. 20 जुलै रोजी जिल्हा परिषद येथे आरोग्य समितीची सभा संपन्न झाली त्या वेळी त्यांनी सभेत उपस्थित जिल्हा परिषद सदस्य व तालुका आरोग्य अधिकारी यांना संबोधित केले.
आरोग्य समिती सभा प्रसंगी समिती सदस्य वैशालीताई पंधरे, छायाताई नागपुरे,गिताताई लिल्हारे,पवनजी पटले, सुधाताई रहांगडाले, डॉ. भुमेश्वर पटले, पौर्णिमाताई ढेंगे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, पर्यवेक्षक उपस्थित होते.
शून्य ते पाच वयोगटातील एकूण बालके, सर्वेक्षणादरम्यान लसीकरणापासून वंचित असलेली बालके तसेच विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत दररोज लस देण्यात आलेली बालके व उर्वरित बालके आदी माहिती रोज अद्यावित करावी. सर्वेक्षण मोहीम अंतर्गत घरोघरी भेटी देऊन बालके व गरोदर मातांच्या नोंदणीचे काम योग्य पद्धतीने करा. याकरिता आशा, अंगणवाडी सेविका यांना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी समन्वय साधुन सहभाग घेण्याचे आवाहन ईतर कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य यांना केले.
विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम अंतर्गत दि. 17 ते 25 जुलै दरम्यान घरोघरी सर्वेक्षण करून लसीकरणापासून वंचित बालकांची व गरोदर मातांची माहिती घेऊन नोंदणी केली जात आहे. दि. 7 ते 12 ऑगस्ट, दि. 11 ते 16 सप्टेंबर व दि. 9 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी या प्रसंगी दिली.
गरोदर मातांचे व मूल जन्माला आल्यापासुन ते 16 वर्षापर्यंत बालकांचे नियमित लसीकरण करावी लागते. यासाठी महिलांना आरोग्य विभागाकडून माता-बाल संगोपन कार्ड पुरवले जाते. त्यावर लसीकरणाच्या नोंदणी असतात. हे कार्ड जपून ठेवावे लागते. परंतु आता आरोग्य विभागाचे नियमित लसीकरण ऑनलाईन डिजीटल होणार आहे.यासाठी संपूर्ण देशात यु- विन पोर्टल विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम पासुन सुरू केले जाणार असून जिल्ह्यात त्याबाबतचे सर्व प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी या प्रसंगी दिली.
प्रत्येक बालकाच्या लसीकरणासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन काम करा : आरोग्य सभापती यशवंत गणवीर
RELATED ARTICLES