Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedबाळंतीण मृत्यू प्रकरणी तीन सदस्य चौकशी समिती गठीत

बाळंतीण मृत्यू प्रकरणी तीन सदस्य चौकशी समिती गठीत

गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळंतीणीवर योग्य उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत्यूच्या नातेवाईकांनी केला. यावरुन केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात मंगळवारी (दि.१५) संताप व्यक्त केला. यासंबंधिचे वृत्त प्रसारमाध्यमात प्रकाशित होताच त्याची दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घाेरपडे यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यी चौकशी समिती बुधवारी (दि.१६) गठीत केली आहे. या चौकशी समितीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अपूर्वा पावडे, डॉ. प्रसाद उपग्नलावर, डॉ. सुरेश सुंगध यांचा समावेश आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करुन २१ एप्रिलपर्यंत आपला अहवाल अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्याकडे सादर करणार आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात बाळंतीणीच्या कुटुंबीयांनी अद्याप लेखी तक्रार रुग्णालयाकडे केली नाही.
शहरातील आंबेडकर वॉर्ड सिंगलटोली येथील रहिवासी प्रतिभा मुकेश उके (३०) हिला प्रसूतीसाठी येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात ११ एप्रिलला दुपारी ४:३० वाजता दाखल करण्यात आले. १२ एप्रिलच्या पहाटे २:०७ वाजता सामान्य प्रसूतीतून तिने बाळाला जन्म दिला. परंतु प्रसूतीनंतर तिला अधिक रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. परंतु तिची प्रकृती गंभीर पाहून तिला १२ एप्रिलला सकाळी १० वाजता केटीएस रुग्णालयात येथे मुलासह रेफर करण्यात आले. दोन दिवस उपचार सुरू असतानाही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. परिणामी तिचा १५ एप्रिलला सकाळी ११:३२ वाजता तिचा मृत्यू झाला होता. बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील डॉक्टरांनी सामान्य प्रसूतीसाठी वाट पाहिली तिचे वेळीच सिझर केले नाही. परिणामी पोटावर ताण येऊन गर्भाशय फाटले व अधिक रक्तस्त्राव झाला. परिणामी तिला सहा बॉटल रक्त चढविण्यात आले. यामुळे बाळंतीणीच्या किडनी व हदयावर परिणाम होवून तिचा मृत्यू झाल्याचा आरोप बाळंतीणीच्या नातेवाईकांनी केला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments