गोरेगाँव। दि.18/12/2022 कटंगी ला झालेल्या निवडणुकीत परिवर्तन आघाडी कटंगी चे सरपंच पदाचे उमेदवार तुलसीताई मेघनाथ टेंभरे यांना 197 मतांनी विजय मिळाला. व आघाडीचे 9 पैकी 5 सदस्यांनी विजय पताका फहरवली. त्यात किशोर सोनू बोपचे, राजेश जयलाल चौरागडे, गीताताई मुन्ना गावराने, शिल्पाताई रोशन सहारे व ॠषीकांताताई छोटेलाल चौरागडे या उमेदवारांनी विजय मिळवला.
कटंगी गावाच्या विकासासाठी सरपंच सुशिक्षित असावा म्हणून पदवीधर कारभारी म्हणून वरिष्ठांच्या सहाय्याने तुलसीताई मेघनाथ टेंभरे यांना उमेदवारी जाहीर केली, व तुलसीताई मेघनाथ टेंभरे यांनी 197 मतांची आघाडी घेत निवडणूक बहुमताने जिंकली.
कटंगी मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत रेखलाल टेंभरे यांचा भाजप गट व डोमेश चौरागडे यांचा काँग्रेस गट यांचा गठबंधन करून निवडणूक लढण्यात आली होती.
कटंगी गावचे विकास करण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ ग्रामवासी व नव मतदारांनी भाजप नेते रेखलाल टेंभरे व काँग्रेस नेते डोमेश चौरागडे यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार केला. रेखलाल टेंभरे व डोमेश चौरागडे यांनी सुद्धा कटंगी ग्रामवासियांशी संपर्क साधून भविष्याच्या पाच वर्षातील विकासाच्या नियोजन मतदारांना समजावून सांगितला व परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी संकल्प केला.
परिवर्तन पॅनलच्या प्रचाराची धुरा कटंगीतील नवयुवकांनी आपल्या खांद्यावर घेतली व सर्वसामान्य मतदारांना आपण ग्राम विकासासाठी व ग्राम हितासाठी मतदान करा हे मत समजावून सांगितले. व परिवर्तन पॅनल ग्रामविकासासाठी काम करणार हे लोकांना समजावून सांगितले. करिता परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडणुकीत बहुमतांनी विजयी करा असा प्रचार नवयुवकांनी केला. व परिवर्तन पॅनल ला विजय मिळवून दिला.
परिवर्तन पॅनल मध्ये कटंगी (बु.) चे मार्गदर्शक- रेखलाल टेंभरे (डायरेक्टर जीडीसीसी बॅंक गोंदिया), डुमेश चौरागडे (मा.पं. स. सदस्य), अध्यक्ष- फनेंन्द्र हरिणखेडे, उपाध्यक्ष- ईश्वरजी टेंभुर्णीकर, सचिव- मुन्नाभाऊ राहांगडाले (भाजप अध्यक्ष कटंगी), सदस्य- डॉ योगेश हरिणखेडे, नरेंद्र हरिणखेडे (उपसरपंच), कैलास राहांगडाले, खिलेश्वर चौरागडे, ओ. सी. शहारे, महेंद्र चौरागडे, डिलेश्वर ठाकरे, अंकुश बघेले (अध्यक्ष से. स. सं. कटंगी) यांची उपस्थिति राहिली।