Wednesday, February 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाविकांच्या सोयी-सुविधेसाठी यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावी : जिल्हाधिकारी प्रजित नायर

भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावी : जिल्हाधिकारी प्रजित नायर

कचारगड येथे यात्रेसंदर्भात पुर्वतयारी आढावा
गोंदिया : आदिवासी जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. कचारगड येथे आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थळ असून विविध राज्यातुन भाविक मोठ्या संख्येने कचारगड येथे येतात. यावर्षीची यात्रा दि.30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत आहे. या पाच दिवशीय यात्रेत भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आज कचारगड येथे प्रत्यक्ष पाहणी करून सर्व संबंधित विभागांना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी निर्देश दिले.
कचारगड येथील सगा मांदी ठिया सभागृहात आज (ता.13) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेसंदर्भात आढावा घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, दरवर्षी 2 ते 3 लाख पेक्षा जास्त भाविक कचारगड यात्रेत सहभागी होत असतात. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी यात्रेपूर्वी अपूर्ण असलेली कामे परिपूर्ण करुन घ्यावे. यात्रेदरम्यान रस्त्याची दुरुस्ती, पिण्याचे पाणी शुध्द पाणी, अखंडीत विजेची सुविधा, आरोग्य सुविधा, पार्कींगची व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याच्या ठिकाणी बॅरिकेटींग लावावे. यात्रेदरम्यान योग्य त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे. नगरपरिषदेने मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी. भाविकांच्या सुविधेसाठी बसेसची व्यवस्था करुन वेळापत्रक जाहीर करावे. शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा. यात्रेदरम्यान स्वयंसेवकांना ड्रेस कोड देण्यात यावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. सभेला उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मधुकर वासनिक, पोलीस उपअधीक्षक प्रमोद मडामे, सहायक वनसंरक्षक एस.एम.डोंगरवार, सार्वजनिक बांधकाम क्र.2 कार्यकारी अभियंता एस.डी. उसेंडी, नगरपंचायत मुख्याधिकारी करिश्मा वैद्य, नायब तहसिलदार अमृता सुतार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, कोसमतर्रा ग्रामपंचायत सरपंच सिंधू घरत व कचारगड देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments