Tuesday, January 21, 2025
Google search engine
HomeUncategorizedमहागांव-निलज अर्जुनी मोरगाव रस्त्यासाठी जनता रस्त्यावर, उपोषणाचा ईशारा

महागांव-निलज अर्जुनी मोरगाव रस्त्यासाठी जनता रस्त्यावर, उपोषणाचा ईशारा

जि.प.बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी केली रस्त्याची पहाणी : उपोषण तात्पुरते स्थगित
गोंदिया : महांगांव- निलज- मोरगांव-ते अर्जुनी मोर. हा पंधरा ते विस गावांचा तालुक्याशी जोडणारा मुख्य रस्ता आहे.आज या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.या रस्त्यावरुन रहदारी करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.या रस्त्याची दुरुस्ती करुन नव्याने हा रस्ता तयार करावा यासाठी जनता आता रस्त्यावर उतरली आहे.तालुक्यातील अन्याय निवारण समीतीचे कार्यकर्ते रेशीम कापगते यांनी रस्त्यासाठी प्रशासनाला आंदोलनाचा व उपोषणाचा ईशारा दिला आहे.त्यासाठी त्यांनी संबधित विभागाला पत्रव्यवहार सुध्दा केला आहे.त्यामधे कापगते यांनी गोंदिया जि.प.चे बांधकाम सभापती संजय टेंभरे यांना भ्रमणध्वनीवरून माहीती दिली.लगेच आज ता.4 डिसेंबर ला सभापती संजय टेंभरे यांनी प्रत्यक्ष येवुन रस्त्याची पहाणी केली.त्यांनीही रस्त्याची अवस्था दयनीय असल्याची कबुली दिली.व लगेच सध्या पॅचेश भरण्याचे आदेश जि.प.चे अभियंता निमजे यांना देवुन येत्या दोन,तिन महिण्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन हा रस्ता नव्याने तयार करुन देवु असे आश्वासन दिले.त्यामुळे आमरण उपोषण तूर्तास थांबविण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महागांव- निलज,मालकणपुर,मोरगाव-अर्जुनी रस्ता अत्यंत खराब झालेला आहे.या मार्गावरुन खाजगी वाहणासह एस.टी.आगाराच्या बसेस धावतात.सध्या या रस्त्याची हालत दयनीय झाली आहे.सदर रस्ता हा जि.प.बांधकामाच्या अखत्यारीत येत आहे.मागील पांच ते सहा वर्षापुर्वी या रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातुन करण्यात आले होते.मात्र आज या रस्त्यावरुन वाहतुक करणे म्हणजे जीवमुठीत घेवुन करावी लागत आहे.आता या रस्त्यासाठी अन्याय निवारण समितीचे रेशीम कापगते आपल्या कार्यकर्त्यासह रस्त्यावर उतरले आहेत.जनतेची मागणी लक्षात घेता गोंदिया जि.प.चे बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी बांधकाम विभागाचे अधिका-यासह स्वत: येवुन रस्त्याची पहाणी केली .व लगेच सदर रस्त्याची डागडुजी करण्यासाठी त्वरीत पॅचेश भरुन रस्ता दुरुस्त करुन देण्याचे आदेश दिले.तसेच या रस्त्याचे मजबुतीकरणासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अंदाजे दोन कोटीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहीती असुन यासाठी आपन शासनस्तरावर पाठपुरावा करुन दोन ते तिन महिण्यात रस्ताचे मजबुतीकरण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन व उपोषण तात्पुरते थांबविण्यात आले आहे.यावेळी तालुका अन्याय निवारण मंचचे सचिव रेशिम कापगते,जि.प.सदस्य कविताताई कापगते,जयश्री देशमुख,अविनाश कापगते वंचितचे तागडे, अभियंता निमजे,ललित डोंगरवार,मधुकर राऊत,विश्वनाथ राऊत व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments