Tuesday, October 15, 2024
Google search engine
HomeUncategorizedमहिला सरपंच अडकली एसीबीच्या जाळ्यात

महिला सरपंच अडकली एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया : ग्राम रोजगार सेवकाकडून पाच हजार रुपयाची लाज घेताना गोंदिया एसीबीने महिला सरपंचाला जाळ्यात फासले ही कारवाई आज मंगळवार एक आक्टोंबर रोजी तिरोडा तालुक्यातील इंदुरा खुर्द येथे करण्यात आले अटक झालेल्या महिला सरपंचाचे नाव सरिता सुनील तुमसरे वय 34 असे आहे.
यासंदर्भात माहिती देण्यात आली की यातील तक्रारदार हे ग्रामपंचायत इंदोरा खुर्द अंतर्गत रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहेत त्यांचे माहे मार्च, एप्रिल, मे व जून 2024 या चार महिन्यांचे मानधन रक्कम रुपये 53200/- चा  धनादेश ग्रामसेवक यांनी स्वताची सही करून तक्रारदार यांच्याकडे दिला. तक्रारदार हे सदर धनादेशावर सही घेण्याकरीता सरपंच सरीता तुमसरे यांना भेटले असता त्यांनी धनादेशावर सही करण्याकरीता तक्रारदार यांच्या कडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी ला.प्र.वि. गोंदिया  येथे तक्रार दिली  होती. लाच मागणी पडताळणी कार्यवाही दरम्यान  सरपंच श्रीमती सरीता तुमसरे यांनी तक्रारदारदाराच्या 53200/-रू रकमेच्या  मानधनाच्या धनादेशावर सही करण्याकरीता पाच हजार रुपये रकमेच्या लाचेची पंचासमक्ष मागणी केली. सापळा कारवाई दरम्यान सरपंच श्रीमती सरीता तुमसरे यांनी पंचासमक्ष 5000/- रुपये लाच रक्कम  स्वीकारली. त्यांना लाच रकमेसह  ताब्यात घेण्यात आले असुन तिरोडा पोलीस ठाणे जिल्हा गोंदिया येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments