महिलेशी अश्लील संभाषण करणारा तो पोलीस कोण?

0
318

गोंदिया : गोरेगाव येथे कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याने तालुक्यातील एका महिलेशी भ्रमणध्वनीवर अश्लिल संभाषण केले. एकदाच नव्हेतर अनेकदा त्या महिलेशी संपर्क करून त्रास देणे सुरू केले आहे. या त्रासाला कंटाळून सदर महिलेने जिल्हा पोलीस अधिक्षकाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत तो पोलीस कर्मचारी कोण? अशी चर्चा सुरू झाली असून सुज्ञ नागरिक त्या पोलीस कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, सदर पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबनाचे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधिक्षकाच्या पटलावर असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

गोरेगाव पोलीस स्टेशन एक ना एक कारणामुळे चर्चेत असतो. गोरेगाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाला अभय कुणाचे? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. त्यातच पोलीस कर्मचारी देखील अवैध व्यवसायिकांशी संपर्कात राहून खिसे गरम असल्याचेही बोलले जात आहे. पण त्यापुढेही जावून गोरेगाव येथील एका पोलीस कर्मचाऱ्याने एका महिलेशी संपर्क साधून अश्लिल संभाषण केले. एवढेच नव्हेतर त्या सातत्याने सर्वसामान्य महिलेशी वारंवार संपर्क करून त्रासही दिला. या त्रासाला कंटाळून सदर महिलेने ऑडीओ रेकॉर्डिंगसह जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केल्याची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे तो पोलीस कर्मचारी कोण? असे चर्चेच्या माध्यमातून नागरिक त्या पोलीस कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत.एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने सदर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव न सांगता त्याच्या निलंबनाचे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधिक्षकाच्या पटलावर असल्याची माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here