गोंदिया : ग्राम मुरडाला (गोंदिया) रानी अवंतीबाई चौक, बस स्टॉप आबादीनगर येथे मंडई मेला उत्सव समितीच्या वतीने दिवाळीच्या पावन पर्वावर मंडई निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मंडईच्या यशस्वी आयोजना बद्दल आयोजकांचे अभिनंदन करीत माजी आमदार श्री राजेंद्र जैन म्हणाले की, शेतकऱ्याच्या मालाला बोनस देण्याबाबद व शासकीय धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने खासदार श्री प्रफुल पटेल यांनी संबंधित मंत्र्यांशी पाठपुरावा केला. विकासासाठी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी सदैव उभे राहुन कार्य करीत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी सर्वश्री राजेंद्रजी जैन, डा.योगेंद्र भगत, केतन तुरकर, निरज उंपवँशी, शंकर टेंभरे, पुजा उपवंशी, कमलेश दमाहे, डा. प्रदिप रोकडे, तुलशीकुमार बघेले, नितिन नागपुरे, क्रिष्णा ठकरेले, बालु मस्करे, कान्हा बघेले, रेशम मस्करे, प्रकाश नागपुरे, अनिल मस्करे, राधेश्याम नागपुरे, शामराव बानेवार, शुभाष गोखे पिंटू बघेले नुतन नागपुरे, हेमराज बिजेवार,महेश टेटे,जितेंद्र मारबदे, सापना सुलाखे, ममता बागडे, सुनिता गोखे, मनिषा पवनाकर, सुंदरी नागपुरे, संगिता कापसे, अजय चौधरी, प्रभू लिल्हारे सहीत मोठ्या संख्येने ग्रामवासी व रसिक उपस्थित होते.