गोंदिया. जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या हद्दीतून जात असलेल्या गोंंदिया- कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारच्या रात्रीला १० ते १०:३० वाजेच्या दरम्यान मुरदोली जंगल परिसरात क्रेटाकारच्या धडकेत एक नर वाघ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.त्या जख्मी वाघाला उपचाराकरिता नागपूरला हलवतांनी वाटेतच मृत्यू झाला.
सदर नर वाघ हा नागझिरातील T१४ वाघिणीचा २ वर्षाचा निम्नवयस्क बच्चा होता.आज शुक्रवारला सकाळी ५ वाजेपासून त्याला rescue करण्याचे अभियान सुरु झाले, सकाळी ७:३० ला वाघाला जेरबंद करण्यात यश आले.वाघाला नागपूरला नेतांनी वाटेतच त्या वाघाचा मृत्यू झाला.वाघ गंभीर जखमी झाल्याने तो हालचाल करू शकत नव्हता, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.वाघाच्या मृतदेहावरील नागपूरच्या गोरेवाडा येथे उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. वन विभागाचे उपवसंरक्षक प्रमोद पांचभाई , विभागीय अधिकारी अतुल देवकर, मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर, सहायक वनंरक्षक राजेंद्र सदगिर, वन परिक्षेत्र अधिकारी रवी भगत, RRT sakoli- नवेगावची चमू आदी यावेळी उपस्थित होती. मुर्दोली परिसरात नेहमी वाघांचे आवागमन होते, सदर परिसरात हायवे मुळे नेहमी वन्य प्राणी मृत्यूमुखी पडतात व एखाद्या घटनेत वाघ पण जावू शकतात. याची आधीच शक्यता वर्तवली होती. सदर रोड नागझिरा – नवेगाव कॉरिडॉर मधील पूर्व नागझिरा परिसरातून जातो आहे. तिथे आता लवकर करण्याची गरज आहे.
मुरदोली जंगलात कारच्या धडकेत वाघाचा मृत्यू
RELATED ARTICLES