सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या संकल्पनेतून मोहाडी ग्रांम पंचायत चा प्रेरणादायी उपक्रम
२३ ऑगस्ट पासून निर्णायाची अंमलबजावणी
गोंंदिय. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा,एक तरी मुलगा पाहिजे अशी मानसिकता समाजात रूजलेली होती आता यात बदल होत असलेच्या सकारात्मक चित्र गोरेगाव तालुका तील मोहाडी ग्रांम पंचायत ने पुढाकार घेत गांवात मुलीच्या जन्मावर तिच्या आई ला ११००₹ व शाल देऊन सत्कार करण्याचा निर्णय घेतला अशाप्रकारे ग्रांम पंचायत ने नागरिकांच्या सेवेसाठी गांवात तीन प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला
दिनांक २३ ऑगस्ट ला मोहाडी ग्रांम पंचायत ची ग्रांम सभा सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेऊन तीन प्रेरणादायी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आले यात पहिली योजना ग्रांम पंचायत बेटी स्मूर्ध्दी योजना अंतर्गत गांवात मुलीच्या जन्मावर तिच्या आई ला रोख ११००₹ व शाल देऊन सत्कार करण्यात येणार आज समाजात मुलगा किंवा मुलगी अशा भेदभाव न करता दोघांनाही समान वागणूक देण्याची गरज आहे त्यांना उच्च शिक्षण, चांगले आरोग्य व चांगले भविष्य देण्याचा प्रत्येक कुटुंबातुन झाल्यास भविष्यात मुलीच्या कार्यकर्तत्वातुन त्या कुटुंबाला समाजात वेगळी ओळख मिळाल्याशिवाय राहणार नाही हि मानसिकता डोळ्यासमोर ठेवून सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या संकल्पनेतून हि प्रेरणादायी योजना ग्रांम पंचायत ने सुरु करण्याचा निर्णय घेतला दुसरी योजना ग्रांम पंचायत कन्यादान योजना अंतर्गत गावातील कोणत्याही परिवारातील मुलीच्या लग्नकार्यात विवाह प्रंसगी त्या मुलीला कन्यादान म्हणून ग्रांम पंचायत कडुण ११००₹ प्रोत्साहन राशी देण्यात येणार,
तिसरी योजना ग्रांम पंचायत सांत्वना योजना अंतर्गत गावातील कोणत्याही परिवारातील व्यक्तींचे मूत्यू झाल्यास त्या परिवारास सांत्वना देण्यासाठी ग्रांम पंचायत कडुण १५००₹ ची राशी देण्यात येणार
अशा सर्व प्रेरणादायी योजना दिनांक २३ ऑगस्ट पासून सुरू करण्याचा निर्णय सर्व गांवकरी यांच्या सहकार्याने घेण्यात आले यावेळी सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, उपसरपंच मोहनलाल पटले, सचिव पी बी टेंभरे व सर्व ग्रांम पंचायत सदस्य व गांवकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——– प्रतिक्रिया ——–
ग्रांम पंचायत मार्फत सुरू करण्यात आलेल्या तीन प्रेरणादायी योजना करिता सर्व ग्रांम पंचायत सदस्य व सर्व गांवकरी बांधवांचा सहकार्य मिळाले यामुळे मोहाडी गांवाची वेगळी ओळख निर्माण झाली हि योजना सुरू करणारी गोरेगाव तालुका तील मोहाडी ही पहिली ग्रांम पंचायत ठरली
– नरेंद्र कुमार चौरागडे सरपंच ग्रांम पंचायत मोहाडी