गोंदिया : मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला जात असताना मागून येणाऱ्या भरधाव बोलेरोने दुचाकीला दिलेल्या धडकेत मुलीच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे.आज (दि.२३)दुपारी तिरोडा तालुक्यातील पांजरा येथे ही घटना घडली. नरेश बोपचे असे अपघातात मृत्यू झालेल्या वडीलाचे नाव आहे. तर वंदना बोपचे, असे जखमी झालेल्या त्यांच्या पत्नीचे नाव आहे.
तिरोडा तालुक्यातील खूरखुडी येथील नरेश फागुराम बोपचे हे आपल्या मोटरसायकल क्रं.MH.31 BD 7423 ने पत्नी वंदना बोपचेसह दुपारच्या दरम्यान आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका नातेवाईकांना वाटण्यासाठी खुरखुडीवरून पांजरा बस स्टॉप जवळून मौजा बीर्सी- तिरोडाकडे जात होते. दरम्यान मागून याणाऱ्या बोलेरो मालवाहकगाडी क्रं.MH.35 k 4658 ची धडक बसल्याने नरेश बोपचे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी जखमी असून त्यांना शासकीय सामान्य रुग्णालय गोंदिया येथे भरती करण्यात आले आहे. तिरोडा पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सहाय्यक फौजदार शिवलाल धावडे आणि अंबादे करीत आहेत.
मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला गेलेल्या वडीलाचा अपघाती मृत्यू
RELATED ARTICLES