Tuesday, September 17, 2024
Google search engine
HomeUncategorizedरक्षाबंधनापूर्वी सर्व पात्र 'लाडकी बहिणांना मिळणार' योजनेचा लाभ, जुलै-ऑगस्ट माहचे 3000 रू....

रक्षाबंधनापूर्वी सर्व पात्र ‘लाडकी बहिणांना मिळणार’ योजनेचा लाभ, जुलै-ऑगस्ट माहचे 3000 रू. थेट खात्यात होणार जमा : पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल

गोंदिया : महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिने राज्यातील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून रक्षाबंधन सणापुर्वी राज्य सरकारकडून जुलै व ऑगस्ट महिन्याचे ३ हजार रूपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. याची पुर्ण खात्री आहे. म्हणुन कोणत्याही शंका-कुशंका महिला भगीनींना बाळगण्याची गरज नाही. ज्या महिलांनी अर्ज केले नाही, त्यांनी अर्ज करावे तर ज्या महिलांचे काही कारणास्तव अर्ज नामंजूर झालेत, या संदर्भात आम्ही राज्य सरकारला जिल्यातील ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्जाची जाणकारी दिली आहे. विशेष म्हणजे ज्या अर्जामध्ये त्रुटी आहे असे अर्ज त्यांनी श्रृट्या पूर्ण करून अर्ज सादर करावे, त्या अर्जाना तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश स्थानिक समितींना दिले आहेत. असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला आश्वास्त केले आहे. अशी माहिती माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी प्रसिध्दी पत्राच्या माध्यमातुन दिली.
माजी आमदार गोपालदास अग्रवाल पुढे म्हणाले, राज्याच्या महायुती सरकारने महिला सक्षमीकरणाचे दृष्टीकोनातून सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना खऱ्या अर्थाने महत्वाकांक्षी योजना ठरणार आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, या योजनेमुळे महिलांमध्ये देखील आशा पल्लवित झाल्या असून उत्साह दिसून येत आहे. यांसदर्भात माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी यंत्रणेकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, गोंदिया जिल्ह्यात आजपावेतो २ लाख ८८ हजार ७७३ महिलांनी अर्ज केले आहे, त्यातील २ लाख ८० हजार २५१ अर्ज मंजूर झाले आहेत, तर ५४८६ अर्ज काही श्रृट्यांमुळे तात्पुरता नामंजूर झाले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून योजने आणि नामांजुर झालेले आवेदन आणि ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही प्रक्रियेत येणाऱ्या अडी-अडचणी बाबतही माहिती देण्यात आली आहे. लाभार्थी महिलांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे ३ हजार रूपये अर्थसहाय्य रक्षाबंधनापूर्वी त्यांच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले नाही, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे, आणि ज्यांचे अर्ज काही श्रृट्यामुळे नामंजूर झाले आहेत, त्या श्रृट्यांची पुर्तता करून घ्यावी, निश्चितपणे योजनेचा लाभ प्रत्येक महिलांना मिळणार, अशी ग्वाही माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments