गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गोंदिया जिल्हा आज बुधवार, २४ जुलै रोजी तहसील ऑफिस समोर आंबेडकर चौक येथे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. जयंत पाटील साहेब यांच्या आदेशानुसार गोंदिया जिल्हा अध्यक्ष सौरभ रोकड़े यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र द्वेषी अर्थसंकल्पनेच्या विरोधात निर्मल सीतारामन यांनी महाराष्ट्रामधील नागरिकांवर अन्याय केल्याबद्दल बी.जे.पी सरकारचे व केंद्र सरकारच्या विरोधात नारे निदर्शने करून निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सौरभ रोकड़े यांनी सांगितले की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध क्षेत्रांच्या विकासासाठी योजनांची घोषणा केली.
एखाद्या राज्याला विशेष मदत करायची आणि इतर राज्यांकडे बघायचंसुद्धा नाही. हा चुकीचा पायंडा मोदी सरकार पाडत आहेत. आज केवळ दोन राज्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्याचं काम केंद्रातल्या भाजपाच्या सरकारने केलं आहे. आंदोलनात जिल्हा कार्याधक्ष मिथुन मेश्राम, जिल्हा कार्याधक्ष बाबा बैस,महिला जिल्हा अध्यक्ष मंजू ताई डोंगरवार, जिल्हा अध्यक्ष (ओबीसी सेल)रूपेश मेंढे, जिल्हा अध्यक्ष (अल्पसंखक सेल) इमरान सैय्यद,जिल्हा महासचिव तीरथ येटरे, जिल्हा उपाध्यक्ष बालू वंजारी, तालुका अध्यक्ष गोंदिया खोमेंद्र कटरे, आमगांव तालुका अध्यक्ष भूमेश शेंडे, तिरोड़ा तालुका अध्यक्ष हेमराज अंबुले,गोरेगांव तालुका अध्यक्ष प्रकाश बघेलेज,सालेकसा तालुका अध्यक्ष विजय वाढ़ाई,गोंदिया शहर अध्यक्ष महिला वैशाली पारधी,गोंदिया विधानसभा अध्यक्ष शेखर चामट, यूसुफ भाई, अकरम भाई , लखनलालजी पटले, इज्जू टेले,अक्की अग्रहरी,जगदीश टोंढरे,सोनू जरिया, बल्लू भाऊ बलभद्रे, आशीष अग्रहरी, गुड्डू राने,दीनू मडावी,अंकुश शिवनकर,रोहित लारोकर, विजेंद्र रहांगडाले, विक्की अवस्थी, शिवम वैद्य,सागर सनेश,जावेद कुरैशी, सोनू खान,अभय रामटेके,विवेक रहांगडाले आदी पधाधिकारी उपस्थित होते.
राकाँपा गोंदियातर्फे महाराष्ट्र द्वेषी अर्थसंकल्पनेच्या विरोधात बीजेपी व केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन
RELATED ARTICLES






